Home / आरोग्य / इतका सोपा उपाय..फक्त 4 मिनिट याने मालिश करा; केसातील उवा आणि लिखा गळून पडतील,केस वेगाने वाढतील

इतका सोपा उपाय..फक्त 4 मिनिट याने मालिश करा; केसातील उवा आणि लिखा गळून पडतील,केस वेगाने वाढतील

नमस्कार, केसांमधील उवा लिखा मा’रण्यासाठी अत्यंत सोपा घरगुती उपाय.

मित्रांनो केसांमध्ये उवा आणि लिखा होणे हा काही आजार किंवा आजाराचे लक्षण नाही. पण यामुळे सतत आणि विनाकारण डोके खाजवत राहते. लहान असो की मोठे अगदी कोणाच्याही केसांना उवा आणि लिखा होऊ शकतात. अगदी दररोज केस धुतल्याने देखील डोक्यात आलेल्या व आणि लिखा जात नसतील तर बाजारातील केमिकलयुक्त हेआर रोडचा वापर करण्यापेक्षा किंवा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा आजचा हा अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेला दुहेरी असा घरगुती उपाय तुम्ही फक्त चार ते पाच दिवस करा. तुमच्या केसातील उवा अनी लिखा पूर्णपणे नष्ट होतील.

चला तर पाहुयात हा उपाय कसा बनवायचा ते. आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे नारळाचे तेल आपल्या घरामधील साधारण दोन चमचे नारळाचे तेल घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे भीमसेन कापूर कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध होतो. भीमसेन कापराला एक विशिष्ट असा सुवास असतो जो उवा आणि लिखांना सहन होत नाही आणि या कारणामुळे उवा आणि लिखा मर’तात.

आपण साधारण एक छोट्या तुकड्याची किंवा एक ग्राम कापूर वडी ची बारीक पावडर बनवून तेलात ऍड करायचे आहे. आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात घेऊन चार ते पाच दिवस पुरेल एवढे ते एकदाच स्टोअर करून ठेवू शकता. केस धुण्यापूर्वी अर्धा तास या तेलाने केसांची आणि केसांच्या मुळाशी मालिश करायचे आहे. आणि अर्धा तास एखाद्या सुती कपड्याने केस बांधून ठेवायचे आहेत.

आता केस धुण्यासाठी एक साधा उपाय करायचा आहे यासाठी एक भांडे घेऊन त्यामध्ये दोन ग्लास किंवा तुमच्या केसांच्या हिशेबाप्रमाणे पाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे कडुनिंबाची ताजी पाने कढीलिंबाची ताजी पाने घेऊन या पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळून घ्यायचे आहे. मित्रांनो कडूनिंबाच्या पानांच्या अंतीबॅक्टरियल आणि अंतीमायक्रोबियल गुणधर्मामुळे उवा आणि लिखांना सहन होत नाही आणि ते मर’तात आणि केस विंचरताना अगदी सहजपणे त्या गळून पडतात.

याशिवाय केसांमध्ये चाई पडलेली असेल केसांमधील कोंडा किंवा केसांमधील फंगल इन्फेक्शन देखील या पाण्याने केस धुतल्याने नष्ट होतात. पाणी उकळून घेतल्यानंतर हे पाणी थोडे थंड होऊ देणे आहे यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे. केस धुण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे तुमच्याजवळ कडू लिंबाचे झाड असेल तर याचा ताजा पाला आणून दररोजचा उपाय करायचा आहे. किंवा एकदाच जास्त प्रमाणात पाणी आणि कडुलिंबाची पाने घेऊन असे पाणी भरून ठेवू शकता. या एवढ्या उपायाने जास्तीत जास्त चार ते पाच दिवसातच केसातील उवा अनी लिखांचा नायनाट होतो. माहिती आवडली तर शेअर करा

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *