Home / अध्यात्म / १४ मे अक्षयत्रितिया यापैकी कुठलीही १ वस्तू आणा घरात,गरिबी नावालाही राहणार नाही..

१४ मे अक्षयत्रितिया यापैकी कुठलीही १ वस्तू आणा घरात,गरिबी नावालाही राहणार नाही..

अक्षय तृतीया १४ मे ला आली आहे.अत्यंत शुभ संयोग कारण ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मी चा वार आहे.या दिवशी विशेष रूपाने माता लक्ष्मीची पूजा केली जाते मात्र लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय शुक्रवार या दिवशी केले जातात आणि ही अक्षयतृतीया शुक्रवारी आल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे.

तरी या शुभ दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास राहावा यासाठी काही वस्तू आपल्या घरात आणायचे आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यास देखील खूप मोठे महत्त्व आहे असे म्हटले जाते की या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये सोने खरेदी करून आणतात त्यांच्या घरात नेहमी बरकत राहते सुख समृद्धी येते.

पण आणखी काही गोष्टी आहेत काही वस्तू आहेत ज्या आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणल्या तर त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल.सध्याच्या महागाईच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शक्य नसते पण अशा काही वस्तू आहे जे आपण सहज खरेदी करू शकतो.

तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची पारद मूर्ती होय मित्रांनो अक्षयतृतीयेच्या या शुभ दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती आणली तर यामुळे माता लक्ष्मी चा स्थायीनिवास आपल्या घरामध्ये राहतो ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे तिची पूजा करायची आहे.

दुसरी वस्तू आहे कवडी माता लक्ष्मी प्रमाणे ही कवडी देखील समुद्रातून निघालेली आहे उत्पन्न झालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कवडी घेऊन यायचे आहे आणि आपल्या देवघरातील स्थापित करायचे आहे दररोज पूजा करायची आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करते ज्या घरामध्ये असेल त्या घरांमध्ये कधीही धन कमी राहत नाही ते घर नेहमी पैशांनी भरलेले राहील.

हि वस्तू घरी आणली तर कधीच धन कमी राहत नाही नेहमी पैशांनी भरलेले राहील ती वस्तू आहे ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख दक्षिणावर्ती शंख धनदायक मानला जातो.ज्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत अशा लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्या घरात दक्षिणावर्ती शंख आणि त्याची पूजा केली तर त्या घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतात. पुढची वस्तू आहेत एक म्हणजे एकाक्षी नारळ श्रीफळ देखील म्हटले जाते प्रत्येक शुभ कार्याला नारळ फोडला जातो तर आपल्याला या दिवशी घरात आणायचा आहे असा हा नारळ आपल्याला या दिवशी घरात आणायचे आहे पण हा एकाक्षी असावा सामान्य नारळाला तीन डोळे असतात पण ज्यांना एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असे म्हटले जाते तर असा हा एकाक्षी नारळ आपल्याला घरात आणायचा आहे आणि पूजा स्थानावर त्याची स्थापना करायची आहे.

पुढची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे साक्षात माता लक्ष्मी चे स्वरूप मानले जाते ज्या घरामध्ये दररोज श्रीयंत्राची पूजा केली जाते तिथे अन्नधान्याची कमतरता कधीही राहत नाही लक्ष्मी सदैव त्या घरामध्ये वास करते त्या घरामध्ये दारिद्र्य येत नाही त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामाद्धे यापैकी एक वस्तू आणायची आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *