आपल्याला लोक कधी कधी घालून पाडून बोलतात आपण काही चुकी केली नसताना. आपमान करायचा प्रयत्न करतात. काही लोकनिष्कारण आपल्यामध्ये दोष काडतात. मग अशावेळेस आपण दुखावतो, निराश होतो, गोष्टी मनाला लावून घेतो. तुम्ही जर अशा लोकांपैकीच असाल गोष्टी मनाला लावून घेतात तर मग आजचालेख तुमच्यासाठी आहे.

ह्या लेखातील मर्म तुम्हाला कळाले तरतुम्ही फालतू लोकांच्या गोष्टी मनाला लावूनघ्यायचे तुमचे प्रमाण 100 टक्के कमी हाेईल आणि शेवटी मी तुम्हाला एक टेक्नीक सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीची गोष्ट मनाला लावून घेऊन दुःखी होणार नाही. म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सुट्टीच्या दिवशी तुम्ही पांढरे स्पोर्ट्स शूज घातले आहे. तुम्ही मित्राला भेटायला जाता. तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो एका पायात पांढरा आणि दुसर्या पायात काळा शूज का घातला आहेस. तुम्ही थाेड आश्चर्य व्यक्त करता. त्याला तुम्ही म्हणता आरे नीट बघ मी दोन्ही पायात पांढरे शूज घातले आहे. तरी सुद्धा तुम्हाला म्हणतो नाही तु दाेन्ही पायात वेगवेगळी बुट घातले आहे.

तु खूप विचित्र दिसत आहे. आता तुमचा प्रतिसाद काय असेल? एक तर तुम्हाला हसू येईल किंवा हैराण व्हाल किंवातो म्हणाला आहेते मनाला लावून घेणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही बूट बरोबर घातले आहेत बाकी कोणाला नाही फक्त ह्यालाच फरक जाणवतो. म्हणजे तो प्रॉब्लेम त्या मित्राचा आहे, त्याच्या नजरेत आहे, त्याच्या विचारात आहे. ह्या वरून आपल्याला शिकायला भेटते काही फरक पडत नाही लाेक तुमच्याबद्दल काय बोलतात.

जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात तर मग लोक काहीही बोलू दे तुमच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकांमध्ये एवढा दम नाही ते तुम्हाला त्रास मनस्ताप देऊ शकतील. तुम्ही तुमच्या विचारांनी भीतीने स्वतःला त्रासकरून घेता. माझी स्वतःची खरी घडलेली गोष्ट सांगतो लहानपणी शाळेत जातो त्या रस्त्यावर बरीच घरं होती. त्यापैकी एका घरामध्ये एक वेडी तरुणी रहायची. ती काय करायची खिडकीमध्ये बसून येणार्या् जाणार्यां ना काही पण वाईट बोलायची.

वेडी आहे त्यामुळे तिच्या बोलण्याकडे काेणी लक्ष देत नव्हते. कोणी तिच्या गोष्टी मनाला लावून घेत नव्हते. हे मला हे सांगायचे नाही कोणी तुम्हाला शिव्या दिल्यातर गप्प बसा पण हे पण दाखवून द्यायचे आहे की एखादा आपल्याला वाईट बोलला तर त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्यावर आहे.

ह्याजगात कोणाची ताकद नाही की तुमचा मूड खराब करायची, तुम्हाला दुखवायची जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला दुःखी करत नाही. सासू सुनेचे पटत नाही. काही मेसेज असतात काही माणसे आम्हाला खूप त्रास देतात आणि मग आमची चिडचिड होते. मित्रांनो यालेखा मधुन मधून हेच सांगायचे आहे जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला राग, तुमचं मन कोणी दुखावणार नाही.

समोच्या व्यक्तीबरोबर आधी सामंजस्याने घ्यायचा प्रयत्न करा पण ती समोरची व्यक्ती स्वभावतःच दृष्टी असेल न बदलणारे असेल तर मनामध्ये असा विचार केला की ती समोरची व्यक्ती भेटली आहे ती वेडी आहे भ्रमीष्ट झाली आहे. आता आपण ती टेक्नीक बघूया जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते त्या व्यक्तीचे चित्र मनामध्ये आणा डोळे बंद केले तरी चालते. नंतर तीव्यक्ती जाेकर आहे असा विचार करा डोक्यावर टोपी आहे विचित्र मेकअप केला आहे तुम्हाला थोड हसु आल्यासारखे वाटेल.

आता तुम्हाला ती व्यक्ती ज्या शब्दाने दःखवते ते शब्द त्या जाेकरच्या वेशात बोलत आहे असा विचार करा. काय फरक पडतोय का तुम्हाला जाम हसू येईल. हा प्रयोग तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती बरोबरच नेहमी करू शकता. या प्रयोगामुळे तुम्हाला जर कोणी काही बोललेतर तुम्ही ते मनाला लावून घेणार नाही, त्याचे दुःख वाटणार नाही. लोकांचे कामच आहे. इतरांचे दोष काढणे आणि जे कधी खुश होणार नाही त्यांना कशाला खुश ठेवायचे ज्यांना तुमच्या बरोबर राहायला आवडतं ते तुमच्याकडे काही नसताना सुद्धा खूश राहतील. त्यापेक्षा जसे आहात तसे स्वीकारा त्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असतील तिथे सुधारणा करा प्रेम करा. तुमच्या बद्दल प्रेम असेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल. कारण आयुष्य खूप सुंदर आहे.

1 Comments

  1. Mla aajch asa anubhav ala ahe ani mi tyach vicharat basle hote pn ha lekh wachun khup bar watal.nice

    ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post