ब्रिटिश काळामध्ये मालवाहतुकी साठी रेल्वे हे खूपच जास्त वापरलं जाणार साधन भारतामध्ये पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला धावली होती.ब्रिटिशांनी त्यांच्या अभिपत्याखालील प्रदेश हळूहळू रेल्वेने जोडला.नवीन शहरे उभारली आणि ती सुध्दा रेल्वेनी जोडून घेतली.तत्कालीन ब्रिटिश इंडिया मधील आणि आता पाकिस्तान मध्ये असलेले फैसलाबाद(तत्कालीन लाईलपूर)1892 मध्ये वसवण्यात आले.

इथूनच जवळ असणाऱ्या बचीयाना रेल्वेस्टेशनपासून 5 किमी अंतरावरती गंगापूर हे गांव आहे जिथे जवळपास 100 वर्षापूर्वीची घोडट्रेन(घोड्याच्या बळाने/वापराने ओढली जाणारी रेलगाडी)आजही दळणवळणासाठी वापरली जाते.स्थानिकांच्या मते सर गंगाराम यांनी फैसलाबादला जलद मालपुरवठा व्हावा म्हणून ही घोडट्रेन सुविधा चालू केली होती.ही जवळपास 100 वर्ष जुनी घोडट्रेन आजही अगदी दिमाखात आपलं काम करत आहे.

या घोडट्रेन ला चित्रात दाखवल्याप्रमाणे घोडारेल्वेच्या पटरीवरून ओढत नेत आहे.आम्ही तुम्हाला ही घोडट्रेन कशी काम करते हे सांगतो.सर गंगाराम यांनी गावातील सामान लगेच शहरात पोहोच करता यावे यासाठी गंगापूर ते बचीयाना रेल्वेस्टेशनपर्यंत 2 फूट रुंद आणि 5 किमी लांब रेल्वेपटरी तयार केली.पण या रेल्वेपटरी वरती एक वेगळीच वाहतूक सुरू केली गेली होती. ही घोडट्रेन वाहतूक लाकडीपायदान असलेली आणि लोखंडी चाक असलेली एक ट्रॉली होती.

या ट्रॉलीला इंजिनच्या ऐवजी घोडा ओढून नेत होता.2 किंवा 3 ट्रॉलीजोडून एक घोडट्रेन होत होती. प्रत्येक ट्रॉली वरती 10 प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सोय होती.शहरापासून गावात जायला चांगलारस्ता नसल्यामुळे घोडट्रेन त्यावेळीची जलद सवारी होती.100 वर्षे झाले तरी ही घोडट्रेन अजूनही गंगापुर गावामध्ये तितक्याच जोमानंचालवली जातेय.गावातील लोक घोडट्रेन उभा असलेल्या ठिकाणी जाऊन ट्रॉली मध्ये बसतात.ट्रॉली भरली की घोडट्रेन चा घोडा ट्रॉली ला लावला जातो.सर्वांच्याकडून भाडे घेऊन घोडट्रेन चालू होते.घोडा बरोबर 2 फूट रुंद पटरीमधून पळत असतो.

घोडट्रेन ला जलद जाता यावं म्हणून पटरीमधील अडथळे मातीने भरून एकसमानकेलेले आहेत.या घोडट्रेन ला आपत्कालीन ब्रेक पण आहे हे वैशिष्ट्य.जेंव्हा दोन घोडट्रेन एकमेकांसमोर येतात तेंव्हा चालक घोडट्रेनथांबवून एकमेकांच्या ट्रॉली बदलतात.चालक आपला घोडा आणि प्रवासी दुसऱ्या घोडट्रेन च्या ट्रॉलीला बदलतात.समोरून आलेल्याघोडट्रेन चा चालक पण हेच करतो.

हे सर्व अगदी नम्रपणे आणि कोणत्याही भांडणाविना होते. ही प्रसिद्ध घोडट्रेन गंगापूर गावासाठी 100 वर्षापासून सेवा देत आहे.एवढ्या अधिनुकतेच्या काळात पण ही घोडट्रेन एक पर्यावरण पूरक आणि प्रदूषण विरहित सवारी म्हणूनसगळीकडे प्रसिद्ध होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post