टीव्हीवरील सर्वात जास्त टीआरपी असलेला मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही मालिका आवडीने पाहतात. या मालिकेचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत भारतातील सर्व संस्कृतीचे लोक राहतात. जसे की मराठी परिवार, गुजराती परिवार, पंजाबी परिवार इत्यादी. या मालिकेतील प्रत्येक पात्राचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. मालिकेतील डायलॉग ने समोरचा प्रेक्षक अगदी खळखळून हसत असतो.

रोजच्या ताण-तणावाच्या जीवनामध्ये माणसाला आपले मन हलके करायचे असते. त्यासाठी सोनी वाहिनीवरील ही मालिका खूपच फायदेशीर ठरते. भारतातील सर्वात जास्त टीआरपी असलेली टीव्ही मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही आहे. लहान मुलांना देखील ही मालिका खूप आवडते. लहान मुलांसह अगदी वयोवृद्ध मंडळीदेखील ही मालिका आवडीने पाहतात.

आज आम्ही या लेखातून या मालिकेतील एका पात्र विषयी सांगणार आहे. या पात्राला ही मालिका पाहणारे प्रेक्षक वर्ग नक्कीच ओळखत असतील. या मालिकेतील एक पात्र म्हणजे अंजली भाभी ज्या या मालिकेतील तारक मेहता यांच्या पत्नी आहे. तारक यांना डायट फूड खाण्यासाठी खूपच त्रास देत असतात. हे आहे त्यांच्या मालिकेतील पात्र परंतु त्यांची खऱ्या आयुष्यात अशी पर्सनॅलिटी आहे किंवा खऱ्या आयुष्यात जगणारी लाइफ आहे जी तुम्ही जाणून तुम्ही हैराण व्हाल.

त्यांचे खरे नाव नेहा मेहता असे आहे. नेहा मेहता या गुजरात च्या आहे. तसे पाहिले गेले तर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील बरेचशे कलाकार हे गुजरात मधूनच आहे.नेहा मेहता यांनी एक्टिंग मध्ये मास्टर डिप्लोमा केला आहे. नेहा एका लेखक परिवारातून आहे त्यामुळे त्यांना कला क्षेत्रात येण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी एक्टिंग मध्ये मास्टर डिप्लोमा पूर्ण करून या एक्टिंग क्षेत्रात पाय ठेवला. नेहा यांचे घरी लेखन असल्यामुळे त्यांना या क्षेत्रात जाण्यासाठी परिवारा कडून खूप सपोर्ट भेटला. नेहा या एक्टिंग सोबतच डान्स देखील उत्तम रित्या करतात. त्या भरतनाट्यम मध्ये देखील पारंगत आहे.

त्यांची एक्टिंग तर तुम्ही पाहिली असेल किंवा पहिलीच आहे. तर आता बोलूयात त्यांच्या ड्रेसिंग विषयी. रियल लाईफ मध्ये त्या खूपच मॉडर्न पद्धतीने आपले आयुष्य जगतात. त्यांचा हा लूक अनेक लोकांना आवडतो. नेहा सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत असते. नेहा विषयीची ही गोष्ट एकूण तुम्ही हैराण व्हाल, नेहा आता 42 वर्षाच्या असून त्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. हो त्या त्यांच्या आयुष्यात अजूनही सिंगल आहे. त्यांना सिंगल राहायला आवडते असे त्या सांगतात. त्यांनी डॉलर बहू या मालिकेत देखील काम केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post