आपल्या मानवी जीवनामध्ये नात्यांना खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. नात्यांवरच आपले जीवन चालत असते. आज आपण बघणार आहोत ही एका मनुष्याच्या जीवनातील नाते कसे बनू शकते. आज आम्ही चाणक्याची अशी एक नीती सांगणार आहे जी तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ही नीती वापरून तुम्ही सुंदररित्या जीवन जगू शकता. आचार्य चाणक्य हे एक महान ज्ञानी तर होतेच पण त्यासोबतच ते एक चांगल्या प्रकारचे नीती कार सुद्धा होते. त्यांनी मनुष्याला जीवनामध्ये यशस्वी बनवण्यासाठी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. आज आम्ही आचार्य चाणक्य द्वारे सांगण्यात आलेल्या सहा नियमांविषयी सांगणार आहोत जे वापरून तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता.

1) सत्य:-कोणीतरी असे म्हटलेच आहे की सत्याचा मार्ग हा सर्वात चांगला मार्ग आहे. सत्याला नेहमी आपली आई म्हणून स्वीकार केले पाहिजे. या जगातील सर्वात सुंदर नाते आहे एका आई आणि मुलाचे. एक आई आपल्या मुलावर सतत प्रेम करत असते. जेव्हा पण आपल्याला काही ठेच किंवा काही लागते तेव्हा आपल्या तोंडातून आपोआप आई म्हणून शब्द बाहेर येतो. अशाप्रकारेच तोंडावर नेहमी सत्य आले पाहिजे. सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तींना कधीही भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखादे बालक आपल्या आईच्या मांडीवर बसलेले असते त्याला त्याच्या आईवर पूर्ण विश्वास असतो की ही आपल्याला काही करणार नाही. अशाच प्रकारे सत्यावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. सत्याला घाबरून तुम्ही दूर पळू नये. सत्याचा नेहमी विजय होत असतो तुम्ही सत्याची बाजू घेतली पाहिजे.

2) ज्ञान:-आचार्य चाणक्यांनी ज्ञानाला वडिलांचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा आहे की ज्ञानाचा वडिलांप्रमाणे आदर केला पाहिजे. म्हणजेच वडिलांचा ज्याप्रमाणे आपण आदर करतो त्याच प्रकारे ज्ञानाचा देखील आपण आदर केला पाहिजे. आपण कधी कुठे काही अडचणीत असल्यास आपल्याला वाचवण्यासाठी सर्वात प्रथम वडील उपस्थित राहतात. अशा प्रकारे ज्ञान देखील तुम्हाला अडचणीत सापडल्यास नक्की मदत करेल. असे सांगितले जाते की अज्ञानी मनुष्य एखाद्या प्राण्यांप्रमाणे असतो जो नेहमी जड कामे करत असतो. पण एक ज्ञानी मनुष्य त्याच्या ज्ञानाच्या जोरावर कुठल्याही समस्येवर हल काढतो.

3) धर्मचाणक्य म्हणतात धर्माला आपला साथीदार समजले पाहिजे याचा अर्थ असा आहे की धर्माला आपला भाऊ समजून त्याचे रक्षण केले पाहिजे. तुमचा भाऊ तुमची रक्षा करण्यास नेहमी तत्पर असतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असले पाहिजे.4) दय:-दया ही मनुष्याची सर्वात मोठी कला आहे. चाणक्य म्हणतात "दया सखा है।" याचा अर्थ दयेला तुमचा मित्र मानले पाहिजे. दया ही माणसातील असा गुण आहे जो शत्रूला देखील मित्र बनवू शकतो. नेहमी रागात राहणे चांगले नसते. दुसऱ्यांवर दया करणारा मनुष्य नेहमी संसारात पूजनीय असतो. 5) शांती:-चाणक्य असे म्हणतात की शांती ही तुमच्या पत्नी प्रमाणे आहे. कारण शांत वातावरणात मनुष्याचे मन तृप्त होऊन जाते. जसे कि त्या मनुष्याच्या पत्नीला भेटल्यावर त्याचे मन तृप्त होऊन जाते त्याच प्रमाणे शांत वातावरणात मनुष्य देखील तृप्त होऊन जातो. म्हणून मनुष्याला आनंदी राहायचे असेल तर आयुष्यात शांती असणे खूप महत्त्वाचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post