भारत देशामध्ये खूप सारे मंदिर आहेत. काही मंदिरे त्यांच्या बांधकामाला, तिथल्या इतिहासाला, तेथील नक्षीकामाला प्रसिद्ध आहेत. तर काही मंदिरे तेथील विविध रूढी-परंपरा, लोकांची श्रद्धा याच्यासाठी प्रसिद्ध आहेत.आपण बघतो भारतातील सगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद चढवले जातात. जास्त करून मंदिरांमध्ये मिठाई, नारळ, पेढे प्रसाद म्हणून देवासमोर अर्पण केले जाते. पण आज आपण एका अशा मंदिराविषयी जाणून घेणार आहोत, ज्या ठिकाणी चक्क प्रसाद म्हणून बिर्याणी अर्पण केली जाते.भारतामध्ये असे एक मंदिर आहे जिथे पारंपारिक पद्धतीने सुरु असलेल्या या प्रथेनुसार मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून बिर्याणी दिली जाते. हे मंदिर आहे भारतातील तामिळनाडू येथील 'वडकमपट्टी' या गावात. वडक्कमपट्टीतील या मंदिराचे नाव आहे 'मुनियंडी स्वामी मंदिर'.या मंदिरात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात हा प्रसाद तेथील भक्तांना दिला जातो. हा उत्सव मागील वर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. उत्सवामध्ये भक्तांना 1000 किलो ग्रॅम तांदूळ, 250 बकऱ्या आणि 300 कोंबड्या यांची बिर्याणी बनवून ती बिर्याणी प्रसाद म्हणून भक्तांना वितरित केली गेली.

मुनियंडी स्वामींच्या उत्सवात फक्त स्थानिक भक्तच सामील नाही होत. या उत्सवात कोणीही वडकमपट्टी येथे आल्यावर त्यांचे खूप मानापानाने स्वागत करून त्यांना हा प्रसाद दिला जातो. 'द हिंदू' या वृत्तपत्राचा रिपोर्टनुसार या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात बिर्याणीची व्यवस्था केलेली असते. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्यांची व्यवस्था केलेली असते.'मुनियंडी स्वामी' यांचे भक्त या प्रसादाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात, आणि हा प्रसाद बनवून इतर भक्तांना वाटतात. बिर्याणी बनवण्याचे काम पूर्ण रात्र चालते, पहाटे चारपर्यंत सर्व स्वयंपाक आटोपला जातो. पहाटे पाच नंतर सर्व भक्तजनांना प्रसाद वाटण्यास सुरुवात होते आणि हा उत्सव सुरू होतो.हा उत्सव प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यातील 24 तारखेपासून 26 तारखेपर्यंत चालतो. मटन बिर्याणी चा हा प्रसाद मंदिरासमोरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिला जातो. स्वयंपाक तयार करणारे आचारी येथे शंभराच्या संख्येने असतात तसेच बनवण्याची विधी पाहण्यासाठी आलेले लोक देखील असतात. येथील भक्तांचे असे मानणे आहे की 'मुनियंडी स्वामींना' खूष करण्यासाठी मटन बिर्याणी प्रसाद म्हणून चढवली जाते.

मंदिरातील उत्सव आयोजन करणारे 'एन. मुनिस्वरन'सांगतात की सकाळी सकाळी नाष्ट्याला गरम गरम बिर्याणी खाने भक्तांसाठी एक वेगळाच अनुभव असतो' मुनियंडी स्वामींच्या मंदिरात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हा प्रसाद प्रत्येकाला वाटला जातो. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो कुठल्याही समुदायाचा असो त्याला प्रसाद दिला जातो. श्रद्धाळू भक्त उत्सवादरम्यान लांब लांब रांगा लावून प्रसाद घेतात. काही लोक तर त्यांच्या घरून भांडी देखील घेऊन येतात जेणेकरून प्रसाद त्यांच्या घरच्यांसाठी घेऊन जाऊ शकतील.वडक्कमपट्टी या गावात राहणारा प्रत्येक व्यक्तीला बिर्याणी खूप आवडते. एका गावकऱ्यांनी असे सांगितले की बिर्याणी फक्त गावकऱ्यांना नाही तरमुनियांडी स्वामींना सुद्धा आवडते. वडकम पट्टीतील बिर्याणी पूर्ण तामिळनाडू नव्हे तर पूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. यामुळेच मदुराई मध्ये 'श्रीमुनियंडी' नावाचे एक रेस्टॉरंट आहे जिथे प्रसिद्ध डिश म्हणून वडकमपट्टीची बिर्याणी प्रसिद्ध आहे.

Post a Comment

Previous Post Next Post