२०२० मध्ये बॉलिवूडसाठी वाईट बातम्या खुप आल्या आहेत आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टी आता समोर येत आहेत. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान स्पष्ट झालं आहे. त्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजू बाबाला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याची कोविड-१९ चाचणी ही घेण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. तिथुन घरी परतल्यानंतर संजय दत्तने., ११ औगस्त ला दुपारी ४:०० वाजता आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, “हाय मित्रांनो. मी काही वैद्यकीय उपचारासाठी कामातून थोडासा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि मित्र माझ्याबरोबर आहेत आणि मी माझ्या हितचिंतकांना काळजी करू नका किंवा अफवा पसरू नका अशी विनंती करतो.

आपल्या प्रेम आणि शुभेच्छामुळे, मी लवकरच परत येईन! " संजय दत्त ची उपचारासाठी परदेशात जाण्याची शकेता वर्तावली जाते आहे. हा एक मोठा प्रसंग आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी. त्यांची दोन्ही मुले पत्नीसोबत दुबई येथे आहेत. यापूर्वी संजय दत्तच्या कुटूंबाचा कर्करोगाचा इतिहास आहे. संजयची आई नर्गिस यांनाही स्वादुपिंडाचा कर्करोग होता. 1981 मध्ये संजयचा रॉकी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 3 दिवस आधी ज्याने जगाला निरोप दिला होता. संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ‘सडक-२‘ ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ २’, ‘पृथ्वीराज आणि तोरबाज’ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या शूटिंगला ब्रेक लागला होता.

Post a Comment

Previous Post Next Post