संजय दत्तच्या आरोग्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूड चे मुन्नाभाई म्हणून ओळखले जाणारे संजय दत्त यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला असल्याची बातमी समोर येत आहे. संजय दत्तने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टद्वारे सांगितले की एक छोटासा ब्रेक घेत आहे लवकरच परत येईल. संजय दत्त यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याची बातमी काही दिवसापासून येत होती. यामुळे ते दवाखान्यात भरती देखील झाले होते. त्यांच्या फुप्फुसांमध्ये पाणी भरले गेले होते ते पाणी काढल्यानंतर असे समोर आले की संजय दत्त यांना तिसऱ्या स्टेजचा फुफुसाचा कॅन्सर आहे. संजयला कॅन्सर ही गोष्ट नवीन नाहीये. संजय दत्तने आयुष्यात स्वतः पेक्षा जास्त प्रेम केले ती म्हणजे संजय दत्त यांची आई नर्गिस दत्त यांचा देखील कॅन्सर मुळे मृत्यू झाला होता.

एवढेच नव्हे तर संजय दत्त यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा चा देखील ब्रेन ट्यूमर मुळे मृत्यू झाला होता.नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांच्या जीवनामध्ये मध्ये खूपच चांगले सुरू होते पण सुनील दत्त यांनी एक बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा त्यांना कळले की आपली पत्नी नर्गिस हिला कॅन्सर आहे. जगातील सर्वात चांगल्या डॉक्टर कडून त्यांना आपल्या पत्नीचा उपचार करायचा होता. त्यासाठी ते बाहेर देशातही गेले होते नर्गिस यांची किमोथेरपी सुरू असताना नर्गिस यांना प्रचंड वेदना होत होत्या त्या वेदनेने त्यांना खूपच जोरात त्रास होत असत. नर्गिस यांचे दुःख सुनील दत्त यांनी जवळून पाहिले आणि त्यांना सावरून घेतले.

नर्गिस दत्त त्यानंतर कोमामध्ये गेल्या त्यानंतर नर्गिस यांना लाइफ सपोर्ट सिस्टिम ठेवण्यात आले. डॉक्टरांनी तर हात वर केले की यांचा इलाज करणे अशक्य आहे. पण सुनील दत्त यांच्या डोळ्यात एक आशेचा किरण होता की आपली पत्नी बरी होऊ शकेल अशा वेळी डॉक्‍टरांनी सुनील दत्त यांना सल्ला दिला की त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिम वरून काढण्यात यावे जेणेकरून त्या आरामाने आपला प्राण सोडतील पण काही दिवसानंतरच नर्गिस यांचा मृत्यू झाला. नर्गिसने आपला मुलगा संजय दत्त याचा पहिला चित्रपट रॉकी सुद्धा पाहिला नाही रिलीज होण्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली.संजय दत्त यांचे पहिले लग्न 1987 झाली ऋचा शर्मा यांच्याशी झाले होते.

रिचाने संजय दत्त साठी आपले चित्रपट करियर देखील सोडले होते. पण असं सांगितलं जातं की त्यांच्या लव स्टोरी ला तिथेच ब्रेक लागला.जेव्हा ऋचा शर्मा हिला ब्रेन ट्युमर झाला होता. ऋचा उपचारासाठी तीन वर्ष यूएस ला गेली होती. पण 1996 साली ऋचा चे ब्रेन ट्यूमर मुळे निधन झाले.29 जुलै 1959 मध्ये सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्या पोटी जन्मलेले संजय दत्त यांनी बॉलिवूड सोबतच जगभरात आपले नाव कमावले. आई आणि पत्नीच्या मृत्यूमुळे संजय दत्त यांना ट्रेजडी बॉय म्हणून ओळखले गेले. पण परत एकदा संजय दत्त यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संजय दत्त लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post