एका वर्गात एका गणिताच्या शिक्षिकेने सर्व मुलांना स्वतः सोडून बाकीच्या सर्व वर्ग मित्रांची नावे वहीत लिहायला सांगितली व प्रत्येक नावाच्या बाजूला थोडी जागा ठेवायला सांगितले त्यानंतर आपल्या प्रत्येक वर्गमित्र बद्दलची एक चांगली गोष्ट त्याचे नावाची शेजारी लिहायला सांगितले वर्ग चा पुढचा सर्व वेळ मुलांचा ते लिहिण्यात गेला. त्या शनिवारी त्या शिक्षिकेने एका वेगळ्या नव्या पानावर प्रत्येक मुलाचे नाव व त्याच्या शेजारी लिहलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा लिहून काढल्या. सोमवारी वर्गात गेल्यानंतर तिने प्रत्येक मुलाला आपला कागद दिला. थोडावेळ होतो न होतो तोच प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रसंग होता व प्रत्येक जण खूप खुश होता मला नव्हतं माहिती की मी कोणाला इतका आवडू शकतो.

मी कोणासाठी तरी इतका महत्त्वाचा असू शकतो सर्व कमेंट्स अशाच खूप सकारात्मक होत्या व कौतुकास्पद होत्या. त्यानंतर ह्या पेपरची वर्गात कधीही चर्चा झाली नाही शिक्षकांना माहीत सुध्दा नव्हती कि त्या मुलांनी आपापसात चर्चा केली अथवा नाही केली. पालकांना सांगितले कि नाही सांगितलं. त्यांना त्या गोष्टीची काही देणेघेणे सुद्धा नव्हते . तिचा हेतू साध्य झाला होता मुलं एकमेकांवर स्वतःवर प्रचंड खुश होती. व तो ब वर्ग पुढे सरकला. त्या ब वर्गातील अनेक विद्यार्थी कोणी सैन्य ,डॉक्टर,वकील, इंजिनिअर अशा अनेक मोठ्या व उच्च पदांवर कार्यरत होते. त्यामधील एक अविनाश हा सैन्य दलात कार्यरत होता. अविनाश हा कारगिल युद्धामध्ये शहीद झाला.शिक्षिका अविनाशच्या अंतिम संस्कारासाठी गेल्या होत्या. ह्या आदी त्या कधी ही सैनिकाच्या अंतिम संसारासाठी गेल्या नव्हत्या. त्याच्या चेहऱ्यावर जूनु काही एक विषेश शांती होती. जागा गच्च भरली होती.

प्रत्येक मित्र व बाकी सगळे त्याला शेवटचा प्रणाम करून बाजूला होत होते. शिक्षिकेने सर्वात शेवटी अंतिम दर्शन घेतले. तेवढ्यात एक सैनिक तिच्या पाशी येऊन म्हणाला. तुम्ही संजय च्या गणिताच्या शिक्षिका होता का त्यावर होकार दिल्यानंतर सैनिक म्हणाला अविनाश तुमच्याबद्दल खूप बोलायचा अंतिम संस्कार झाल्यानंतर अविनाशचे बरेच वर्गमित्र त्याचे आई-वडील व बरेच जन त्या शिक्षिकेशी बोलायला उत्सुक होते.अविनाश ची आई म्हणाली, तुम्हाला एक चिठ्ठी दाखवायचे आहे असे म्हणून त्यांनी अविनाश जवळ सापडलेली चिठ्ठी जे अनेक वेळा उघडून मिटले होते असे चुरगळली ती चिट्टी काढून पुन्हा म्हणाली. आम्हाला वाटलं तुम्हाला ओळखल वाटत. आम्हाला ही चिट्टी अविनाशपाशी मिळाली ती चिट्टी बागतच तिच्या लक्षात आले तो कागद कुठला होता ते. अनेक वर्षांपूर्वी सहज म्हणून घेतलेल्या एक्टिविटीचा तो कागद होता.

अविनाशचे वडील म्हणाले, तुमचे खूप खूप धन्यवाद मुलांकडून ती सकारात्मक ऍक्टिव्हिटी करून घेतली संजयने तो कागद आयुष्यभर जपून ठेवला होता संजय चे सर्व वर्गमित्र हळू त्या शिक्षेचे भोवती जमायला सुरुवात करू लागले. अर्जुन थोडा स्मितहास्य करून म्हणाला तो कागद अजून माझ्याकडे आहे.मी तो माझ्या कपाट वर लावून ठेवला आहे. पृथ्वीराज ची बायको म्हणाली, पृथ्वीराज ने मला तो कागद आमच्या लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये लावायला सांगितला होता. रेशमी म्हणाली, माझ्याकडे पण तो कागद अजून आहे माझ्या डायरीमध्ये आहे. त्यानंतर दीपालीने तिच्या पाकीट तून तो अर्धवट फाटलेला चुरगळलेला कागद सर्वांना दाखवला. आणि म्हणाली मी हा कागद माझ्याजवळ नेहमी ठेवते मला वाटते आपण सर्वांनी आपले कागद खूप जपून ठेवले आहेत.

हे सर्व पाहून ऐकून शिक्षिकेचे मन भरून आले. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. आपण एकमेकांचे दोष इतक्या पटकन प्रकर्षाने/लगेच बघतो आत्मसात करतो की आपल्या लक्षात येत नाही समोरच्या व्यक्तीमध्ये काही चांगले गुण सुद्धा आहेत. आपले थोडेसे देखील एकमेकांचे गुण बघणे एकमेकांबद्दल कौतुक करणे व समोरच्याला सांगणे की ती तो आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे किती आवडता आहे. हे त्या व्यक्तीची आयुष्यभरासाठी पुंजी होऊ शकते 'जे पेराल तेच उगवेल'.अवगुन ऐवजी कायम गुण व प्रत्येकाचा चांगले पणा फक्त बघावा. सलाम त्या थोर शिक्षकांना..! लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा..! तुमच्या कमेंट्स मुळे आम्हाला प्रेरणा व पुढे असाच लेख बनवण्यास मदत होते..!

Post a Comment

Previous Post Next Post