मित्रांनो आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पाच अश्या गोष्टी सांगणार आहे. जे बुद्धिमान हुशार लोकं त्यांच्या आयुष्यात कधीच करत नाही त्यामुळे ते आयुष्यात खुप यशस्वी आणि श्रीमंत असतात. त्या गोष्टी सांगायच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. आपण सुद्धा या पाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी केले असतील. याचा अर्थ असा होत नाही की आपण वाईट व्यक्ती आहोत किंवा आपण हुशार नाही. पण एक गोष्ट खात्रीने सांगतो की आपण या पाच गोष्टी सातत्याने आपल्या दैनंदिन आयुष्यात करत राहिलो तर आपली अधोगती निश्चित आहे म्हणून तुम्हाला विनंती करेन की हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण ह्या गोष्टी तुम्ही करायचा बंद केला तर तुमचा आयुष्य बदलेल घडेल नक्कीच.

१:- फालतू गप्पा/मस्करी करणे:-ज्याला आपण चकाट्या पिटणे असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो हुशार व्यक्ती फालतू गप्पा पाहण्यात कधीच वेळ घालवत नाही आपल्याकडे चार लोक एकत्र आले की तिथे हजर नसलेली व्यक्तीबद्दल निंदानालस्ती करणास सुरुवात करतात. त्यांची उणीदुणी काढत असतात पण अशा लोकांना माहीत असते समोरचा माझ्यासमोर दुसरा लोकांची निंदा करतोय. तर मग हीच व्यक्ती मी नसताना माझी सुद्धा बदनामी करत असेल. हुशार लोकांना माहिती असते की अशा फालतू गप्पा मारून चकाट्या पेटून काही निष्पन्न होणार नाही. उलट अशा गप्पांमुळे राग दोष मत्सर या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आपल्यासाठीच त्रासदायक ठरतात. हुशार आणि बुद्धिमान लोकांना नवीन आयडियाज बद्दल गप्पा मारायला आवडतात. आपली प्रगती कशा संदर्भात आहे अशा विषयांवर गप्पा मारायला आवडतात. दुसरी गोष्ट हुशार लोक हे वाक्य कधीच बोलत नाही.

२:- मला असे वाटते मी हे केले पाहिजे:-मला असे वाटते मी माझ्या बॉस बरोबर प्रमोशनची बोलले पाहिजे. मला असे वाटते मी नवीन व्यवसाय चालू केला पाहिजे. मला असे वाटते मी शरीराची काळजी घेतली पाहिजे. ह्या जगात बरेच लोक असे वाक्य वापरत असतात. त्यामुळे त्यांनी ठरवलं ध्येय कधीच साक्षात येत नाही. पण हुशार आणि बुद्धिमान लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात. मी माझ्या बॉस बरोबर प्रमोशनचे बोलणारच. मी नवीन व्यवसाय चालू करणारच. मी माझ्या शरीराची काळजी घेणारच. मला ही गोष्ट आत्ता केलीच पाहिजे. अशा प्रकारची त्यांची मानसिकता असते. हुशार लोक कृती वर जास्त भर देतात भले त्यांना अपयश ऐवू पण ते ठरवलेल्या गोष्टी करतातच. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आयुष्यात यश पाहिजे असेल मला असे वाटते हे केले पाहिजे या आईवजी मी हे करणारच. अशी वाक्य वापरायला सुरुवात करा. तुम्ही बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होते.३:- हुशार आणि बुद्धिमान लोक स्वतःला अजिबात कमी समजत नाही:-हुशार लोकांना ही माहिती असते की ह्या जगात प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी विशेष आहे मग आपण स्वतःला का कमी समजावे. आपण बघत असतो अनेक लोकांमध्ये खास करून आपल्या मराठी लोकांमध्ये प्रचंड न्यूनगंड असतो. अरे तो माणूस खूपच हुशार आहे त्या माणसाची कोणीच बरोबरी करू शकत नाही. त्या माणसासारखे श्रीमंत होणे आपल्या बसची बात नाही. असेच विचार आपण करत असतो. पण वास्तव हीच आहे तुम्ही ह्या जगा मध्ये कोणापेक्षा सुद्धा कमी नाही. तुम्हाला असे वाटत असेल समोरचा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुमच्या पेक्षा बुद्धिमान आहे. तुमच्या पेक्षा हुशार आहे. पण वास्तवता तशी नाही आपण सर्व सारखेच आहोत. आपण या मातीतून निर्माण झाले आहोत आणि शेवटी आपण या मातीतच जाणार आहोत.

४:- हुशार लोक कधीच रागाने समोरच्याला विरोध करत नाही किंवा ते कोणाला तिरस्कार करत नाही:-मित्रांनो हुशार लोक कधीच रागाच्या भरात समोरच्याला विरोध करत नाही. कारण त्यांना माहिती असते प्रेमाने सुद्धा विरोध करता येतो. उदाहरण म्हणजे तू जे म्हणतोय ते सर्वचुकीच आहे. असे म्हणण्यापेक्षा तु जे म्हणतोय ते तुझ्या मानाने बरोबर आहे. पण मला असे वाटते हे असे योग्य असेल. दोन्ही वाक्यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पहिले वाक्य नकारात्मक आहे तर दुसरे वाक्य सकारात्मक आहे. पहिल्या वाक्य मध्ये समोरच्या व्यक्तीचा एक प्रकारे आपण अपमान करत आहोत. तर दुसर्‍या वाक्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीचा आदर करत आहे. मित्रांनो मी असे अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही समोरच्या व्यक्तीचा विरोध करू नका. पण तो विरोध प्रेमाने करा. समोरच्याचा आदर ठेवून करा. जेणेकरून तुमचे नाते तुटणार नाही.

५:- भूतकाळाबद्दल काळजी करत बसणे घडून गेलेल्या गोष्टीचे टेन्शन घेणे:-मित्रांनो छोट्या गोष्टीची काळजी करून काही होणार नसेल तर मग मोठ्या गोष्टींची तरी काळजी कशाला करायचे. सतत तुमच्या भूतकाळाबद्दल गोष्टी आठवूण काळजी करत बसणे. टेन्शन घेत बसणे हा मूर्खपणा आहे. हे असे झाले की तुम्ही देवाकडे सतत मागणी करत बसता. देवा मला परत पाच वर्षाचे लहान मुलं बनाव. जे कधीच शक्य नाही. आपण भूतकाळात जाऊन काहीच बोलू शकत नाही. पण तुमच्या हातामध्ये वर्तमानकाळ आहे त्याचा उपयोग करुन तुम्ही भविष्यकाळ बदलू शकता. अनेक लोक भूत काळामध्ये अडकलेले असतात सतत घडलेल्या गोष्टी चे चिंतन करून स्वतःला त्रास देत असतात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट गोष्टी घडून गेले आहेत. पण आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपण ते बदलू शकत नाही. आपण आपला एटीट्यूड बदलू शकतो आपण आपला दृष्टीकोन बदलू शकतो. भूत काळामध्ये काय चुकले होते त्याचा धडा घेऊन आपण भविष्य काळ बदलू शकतो. भूतकाळ मध्ये घडलेला त्रास दुःख आपण मोटिवेशन मध्ये बदलून एक चांगला भविष्य काल घडवू शकतो. त्यामुळे मित्रांनो मु भूतकाळ मधून शिकून घ्या. वर्तमान काळात काम करा कारण सुंदर भविष्यकाळ तुमची वाट बघत आहे. मित्रांनो ह्या होत्या त्या पाच गोष्टी ज्या बुद्धिमान आणि हुशार लोक कधीच करत नाही...

Post a Comment

Previous Post Next Post