पती-पत्नी म्हटल्यावर भांडणे तर आलीच. असे जगात कुठेच पती-पत्नी नसतील त्यांच्यात भांडणे होत नसतील. घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच. पण याच भांडणामुळे अनेकांचे नाती तुटत असतात. कित्येक जण एकमेकांपासून वेगळे देखील होतात. या भांडणांमध्ये जास्त करून पत्नीचीच चुकी असते असे दिसून आले आहे. दर वेळी हेच बरोबर नाही की पुरुषांची चुकी असेल महिलाही भांडणाला तितक्याच जबाबदार असतात कदाचित जास्तच. महिला लग्नानंतर असे काही गोष्टी करतात ज्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. महिलांचे असे काही वागणे आहे ज्यामुळे लग्नानंतर दुरावा निर्माण होऊ शकतो. आज या लेखातून तुम्हाला महिलांचे असे काही वागणे सांगणार आहे ज्यामुळे त्यांना लग्नानंतर खूप काही अडचणी येऊ शकतात.

लग्नानंतर पती-पत्नीला किंवा जोडप्यांना खूपच ॲडजस्ट करून राहावे लागते. काही वेळा अगदी सहजपणे त्यांचे नाते जुळून जाते. पण काहींचे एकमेकांचे विचार सारखे नसल्यामुळे त्यांच्यात खूपच भांडणे होतात. त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो लोक जास्त करून पुरुषांनाच जबाबदार ठरवतात. पण हे बरोबर नाही की दरवेळी पुरुषाची चुकी असते काही वेळी महिलांची देखील चुकी असते. महिलांची काही वागण्याची पद्धत असते जी लग्ना नंतर त्यांचे जीवन बरबाद करू शकते. यामध्ये तुम्हाला अशा काही महिलांच्या वागण्याची पद्धत सांगणार आहे ज्यामुळे हे सर्व घडते.

बाहेरच्या लोकांची बरोबरी करणे :- खूप महिलांना अशी सवय असते की त्या आपल्या पतीची बरोबरी दुसऱ्या किंवा बाहेरच्या व्यक्तीशी करतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांचा सुरळीत चाललेला संसार मोडकळीस येऊ शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुठल्याही पतीला किंवा पुरुषाला हे आवडत नाही की, आपलीच पत्नी आपल्यासमोर परपुरूषाची स्तुती करून आपली इज्जत काढते, हे साहजिकच आहे की हे मुळीच कुठल्याही पुरुषाला आवडणार नाही.

सासरच्या लोकांशी चांगले न वागणे :- खूपदा असे पाहिले जाते की पती आणि पत्नीमध्ये खूपच चांगले नातेसंबंध असतात. ते एकमेकांच्या भावना खूपच चांगल्या प्रकारे समजत असतात. परंतु पत्नीचे सासरच्या लोकांशी अजिबात बनत नसते किंवा त्यांच्याबद्दल नेहमी तक्रार असते. यामुळे देखील पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. प्रत्येक मुलाला वाटते की आपली पत्नी आपल्या आई-वडिलांचा सन्मान करेल.

पैशाची नासधूस :- प्रत्येक पत्नीचीही इच्छा असते की आपण आपल्या पतीबरोबर एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग करावी, आणि आपल्या पतीने काही न म्हणता केवळ एक स्मितहास्य करत आपले क्रेडीट कार्ड आपल्या हवाली करावे. परंतु सर्व व्यवहारिक जबाबदारी ही पुरुषाच्या हातात असते. त्याला संपूर्ण संसार बघायचा असतो. मुलांच्या शिक्षणापासून घरातील खाण्या पिण्या पर्यंत सर्व त्याला हँडल करायची असते. त्यामुळे तो पत्नीच्या बिग बजेट गरजा पूर्ण करू शकत नाही. यामुळे पत्नी नेहमी पतीविरुद्ध काहीना काही कारणावरून बडबड करत असते आणि त्यामुळे त्यांच्यात भांडणे देखील होतात. अशा प्रकारे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो.

महिलांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की संसाराचा गाडा हा दोघांनी ओढायचा असतो. आपले सासू सासरे हे आपल्या आई-वडिलां प्रमाणे असतात. आपल्या आई-वडिलांना देखील एक सून आहे हे प्रत्येक महिलांनी लक्षात ठेवायला हवे.

Post a Comment

Previous Post Next Post