आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला 5 असे व्यवसाय सांगणार आहे. जे नोकरी करता-करता सुद्धा तुम्ही करू शकता. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो हे साइड बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. कारण हे तुम्हाला नोकरी करता-करता करायचे आहे. हे दिसायला जरी सोपी वाटत असेल पण तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हा अनेक आव्हाने येतील. तुम्हाला कंफर्ट झोन मधून बाहेर यावे लागेल कदाचित तुम्हाला तुमची झोप कमी करावे लागेल काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील कारण प्रामाणिकपणे पैसे मिळवण्यासाठी शक्यतो कुठल्याही शॉर्टकट उपलब्ध नाही. जास्त वेळ वाया न घालवता बागुयात कोणते आहेत ते पाच व्यवसाय...१:- रेफरल बिझनेसव्यवसाय करा आणि ग्राहकाला मधी जोडणारा दुवा म्हणून कमी वेळात तुम्ही जास्त पैसे कमवू शकता एक उदाहरण बघुया आमच्या सोसायटीमध्ये एक माणूस राहतो त्याचा मित्र रत्नागिरीमध्ये हापूस आंब्याचा व्यवसाय करतो आमच्या सोसायटीमध्ये अंदाजे 600 च्या वर फ्लाइट्स तरी असतील. ह्या माणसाने सोसायटी सर्व व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकला रत्नागिरी हापूस आंबा थेट तुमच्या दारात बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये तुम्हाला सांगतो ह्या माणसाला पूर्ण आंब्याच्या सीझनमध्ये शेकडो ऑर्डर्स मिळाल्या ह्या माणसाने काय केले आपल्या रत्नागिरीच्या मित्राकडून आंबे घेऊन आम्हाला विकले. आणि मध्ये प्रत्येक ड ज न मागे 50 ते 100 रुपये कमिशन मिळाले असेल असा आमचा अंदाज आहे.मी स्वतः कॉलेज मध्ये असताना अश्या प्रकारे पैसे कमवले आहेत. माझा एक मित्र होता कम्प्युटर असेंबल करणारा मी कम्प्युटर सायन्स ला असल्यामुळे मला अनेक जण कम्प्युटर विकत घेताना विचारायचं मी त्या सर्व जणांना माझ्या मित्राकडे पाठवत होतो. प्रत्येक कम्प्युटर मागे तो मला हजार रुपये कमिशन द्याचा. त्यामुळे तुम्ही असा विचार करा की तुमच्या कोण मित्र आहे तो व्यवसाय करतो. नसेल तर तुम्ही कोणत्याही व्यवसायाकडून ओळख काढू शकता. आणि तुमच्या संपर्क येणाऱ्यांना रेफर करू शकता. व्यवसाय नोकरी करत-करत आरामात करू शकता.

२:- कन्सल्टेशनमित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये एक्सपर्त असाल तर त्याच्या त्रासाची तुम्ही कन्सल्टेशन हा पार्ट टाइम चालू करू शकता. उदाहरण द्यायचे झाले म्हणजे तुमच्याकडे फायनान्स ज्ञान असेल तर लोकांना तुम्ही गुंतवणूक कशी करायची याचा सल्ला देऊ शकता तुम्हाला फिटनेस ची आवड असेल तर तुम्ही लोकांना वजन कमी करण्यासाठी सल्ला देऊ शकता. किंवा वाढवण्यासाठी सल्ला देऊ शकता. तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आवड असेल तर तुम्ही काउंसलर बनवू शकता. त्यांना सांगू शकता ट्रेस कसा कमी करायचा. रागावर कसे नियंत्रण ठेवायचे. आनंदी कसे राहायचे वगैरे वगैरे सांगायचा मुद्दा काय कन्सल्टेशन हा असा व्यवसाय आहे दिवसाचे दोन तास जरी दिली तर तुम्ही महिन्याला चांगले पैसे कमवू शकता.३:- तुमचे प्रोडक्ट ऑनलाइन विकामित्रांनो तुम्ही ॲमेझॉन वरती किंवा ओएलएक्स वरती तुमच्या वस्तू विकू शकता. मग या वस्तू घरी बसून मोकळ्या वेळेत बनवलेले असतील किंवा मग तुम्ही असे प्रॉडक्ट शोधा. ते फक्त तुमच्या शहरात उपलब्ध आहे. आणि देशाच्या अन्य भागात सुद्धा त्यांची मागणी आहे किंवा तुम्ही जेथे राहतात तेथे होलसेल मार्केट असेल तिथून सुद्धा तुम्ही प्रॉडक्ट घेहून ऑनलाइन विकू शकता. पूर्वी वस्तू विकण्यासाठी तुम्हाला दुकानाची गरज लागत होती. आता तुम्ही सर्व काही ऑनलाईन विकू शकता. ॲमेझॉन किंवा कुठल्याही ऑनलाइन ईकॉमर्स वेबसाइट वर रजिस्टर करण्यासाठी एक प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला गुगल वर किंवा युट्युब वर मिळून जाईल.

४:- ट्युशन घेणेपूर्वीपासून चालत आलेला पण आत्ता सुद्धा तेवढाच डिमांडमध्ये असलेला पैसे कमवायचा मार्ग म्हणजे ट्युशन घेणे. तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील की सुरुवातीला पार्ट टाइम म्हणून लोकांनी ट्युशन घ्यायला सुरुवात केली. आणि नंतर फुल टाइम या व्यवसायामध्ये उतरले आणि भरपूर पैसे कमवाले. तुम्ही कोणत्या विषयांमध्ये एक एक्स्पर्ट आहात. गणित इंग्लिश संगीत आले 100 पेक्षा जास्त लोकांच्या वस्तीत राहता. मग तुम्ही ट्युशनला उत्पन्नाचा वेगळा मार्ग बनवू शकता. फक्त दिवसातील दोन ते तीन तास घेऊन घरातून ट्युशन देऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.५:- ऑनलाइन कोर्स बनवून विकणे मित्रांनो मी माझ्या अनेक लेखांमध्ये सांगितले आहे की भविष्य काल हा ऑनलाइनच असणार आहे. पण परत तोच येतो प्रश्न की तुमचे कौशल्य कशामध्ये आहे तुम्ही कोणत्या क्षेत्राचे एक्सपोर्ट आहात. कारण तुमचे कौशल्य लोकांच्या समस्या सोडवत असेल. तर तुम्ही ऑनलाईन कोर्स बनवून भरपूर पैसे कमवू शकता. मग तो योग असेल मायक्रोसोफ्ट एक्सेल असेल. गिटार वाजवणे असेल प्रोग्रॅमिंग असेल डान्स असेल शेअर मार्केट असेल डिजिटल मार्केटिंग असेल काहीही जे लोकांचे समस्या सोडवत असेल.तर त्याचा कोर्स बनवून ऑनलाईन विकू शकता मित्रांनो हे होते ते पाच साइड बिझिनेस जे तुम्ही नोकरी करत करत सुद्धा करू शकता. परत एकदा सांगतो हे व्यवसाय करण्यासाठी प्रचंड चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post