आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर काय फायदा होतो हे माहिती आहे का तुम्हाला? त्याचबरोबर काय नुकसान होते हेदेखील माहिती आहे का? आपल्या देशामध्ये असे खूपच तुरळक दिसायला मिळते की मुलीचे वय हे मुलाच्या वया पेक्षा जास्त आहे. तरीदेखील ते दोघे एकमेकां बरोबर सुखाने संसार करत आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत की मुलांनी आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर काय फायदे होऊ शकते आणि काय तोटे होऊ शकते. म्हणजेच हे लाभदायक आहे की नुकसानदायक.

आजच्या भारतीय समाजात जगणाऱ्या लोकांची मने आणि विचार खूपच वेगळे आहेत. पण आता मुले मुली एकमेकांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. समोरचा लहान असो किंवा मोठा काळा असो किंवा गोरा एवढेच नव्हे तर समोरचा आपल्या देशातील असो किंवा बाहेरच्या देशातील असो हे काहीच पाहिले जात नाही. एकमेकांची एकमेकांशी मने जुळली की दोघेही लग्नाला तयार होतात.

मागच्या काही वर्षापासून असे पाहण्यात आले आहे की जास्त करून मुले आपल्या पेक्षा जास्त वयाच्या मुलीशी लग्न करतात. मग ते लव मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. पण मुलांच्या घरच्यांना असे हे लग्न मुळीच मान्य नसते. पण काहींना ते मान्य करावेच लागते. आपल्याकडे अशी परंपरा चालत आली आहे की लग्नाला उभी केलेली मुलगी मुलाच्या वया पेक्षा नेहमी कमी वयाची असायला हवी. परंतु ही खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आता मोडकळीस आली आहे. मुलीच्या वयाला एवढे विशेष लक्ष दिले जात नाही. प्रत्येक महिलेला अशा पुरुषाशी लग्न करण्याची इच्छा असते जो पुरुष त्या महिलेची इज्जत करेल त्या महिलेला समजून घेईल तिच्यावर प्रेम करेल आणि सोबतच त्या महिलेची काळजी घेईल. या लेखातून आपण पाहणार आहोत की जर तुम्ही वयाने मोठ्या मुलीशी लग्न केले तर काय फायदे आणि काय तोटे होऊ शकते.

वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याचे फायदे :- वयाने मोठ्या मुलीशी लग्न केल्याचा पहिला फायदा म्हणजे ती मुलगी तुमच्या इतकी समजूतदार असू शकते ती जरी तुमच्या घरात नवीन असली तरी प्रत्येक गोष्टीची तिला समज असते. लग्नानंतर तुम्हाला या गोष्टीची चिंता राहणार नाही की तुमच्या पत्नीला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी समजतील का. ती प्रत्येक गोष्टीत नवनवीन कल्पना ओतण्याचा प्रयत्न करत राहिल. प्रत्येक वेळीच तिला काही गोष्टी समजून नाही सांगाव्या लागणार. या सोबतच ती आपल्या परिवारातील लोकांची काय इच्छा आहे याची देखील काळजी करेल. यासोबतच मुलगी वयाने मोठी असल्यावर तुम्हाला देखील खूप फायदा होईल ती तिच्या अनुभवानुसार तुम्हाला काय चुकीचे आणि काय बरोबर आहे हे सांगेल.;

वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याचे तोटे :- असे पाहिले जाते की वयाने मोठया मुलीशी लग्न करण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. पण हे प्रत्येक व्यक्ती वर अवलंबून आहे की तो हे नाते कसे पाहतो.वयाने मोठया मुलीशी लग्न केल्यानंतर तुम्हाला न मागता देखील सल्ला मिळू शकतो. वयाने मोठ्या मुलीशी लग्न करण्याचे आणखी एक नुकसान म्हणजे मुलगी वयाने मोठी असल्यामुळे तुमच्या दोघांची जोडी इतर जोडयांपेक्षा सुंदर नाही दिसू शकणार.

Post a Comment

Previous Post Next Post