जेव्हापासून इंटरनेट जगात आले आहे तेव्हापासून लोकांचे एकमेकांशी बोलणे कमी झाले आहे. लोक आता चॅटिंग द्वारे एकमेकांशी बोलत आहे. यामुळे लोक एकमेकांपासून फार दूर देखील गेले आहे. पण इंटरनेट मुळेच काही लोक एकमेकांच्या खूपच जवळ देखील आले आहे. परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे एका बाजूला समोर यावेच लागते. इंटरनेट द्वारे अनेकांमध्ये प्रेम देखिल होते. चॅटिंग द्वारे आपल्या भावना एकमेकांना सांगितल्यानंतर अगदी परदेशात जरी समोरची व्यक्ती असली तरी त्याच्याशी प्रेम होते. काहींचे हे प्रेम सफल देखील झाले आहे. त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले आहे.

परंतु काहींनी यामुळे फार धोकेदेखील खाल्ले आहे. कारण समोरची व्यक्ती किती वयाची आहे हे काही सांगता येत नाही. चॅटींग द्वारे कुणाला काय कळणार आहे मी समोरची व्यक्ती कशी आहे व कशी दिसते. चॅटिंग द्वारे फक्त आपल्याला समोरच्या व्यक्तीचा फक्त स्वभाव समजू शकतो. अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक देखील झाली आहे यामध्ये समोरच्या व्यक्तीकडून पैशाची देखील मागणी केली आहे.

आत्ताच एक अशीच घटना समोर आली आहे बोकारो नावाच्या गावात राहणारा 'आनंद सागर' नावाचा तरुण बाहेर राहून आपले शिक्षण पूर्ण करत होता. शिक्षण घेत असतानाच आनंद ची ओळख फेसबुकवर एका महिलेशी झाली. आनंद ने या महिलेला वय विचारले असता या महिलेने आपले वय 21 वर्ष असल्याचे सांगितले. आनंद ला वाटले की आपण जिच्याशी बोलत आहोत ती एक 21 वर्षाची तरुणी आहे. दोघांमध्ये प्रेमा वर खूप चर्चा होऊ लागल्या. दोघे एकमेकांशी तासन्तास गप्पा मारत असत एकेदिवशी त्या महिलेने त्या मुलाला भेटण्यासाठी सेक्टर 4 मध्ये बोलवले.

त्या ठिकाणी त्या महिलेने त्या मुला सोबत एक सेल्फी काढून त्या मुलाला वेड्यात काढले की ती महिला 21 वर्षाची तरुणी आहे. परंतु काही वेळानंतर त्या तरुणाचा असे लक्षात आले की ती 21 वर्षाची तरुणी नसून 37 वर्षाची एक नर्स आहे. एवढेच नाही तर त्या महिलेचे अगोदर लग्न झालेले आहे आणि त्या महिलेला अगोदरच दोन मुले देखील आहे. हि गोष्ट लक्षात आल्यावर आनंद नावाच्या तरुणाने थेट जाऊन पोलिसात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी असे सांगितले की मी या महिलेशी बोलणे बंद केले होते परंतु त्यानंतर त्या महिलेकडून ध-मक्या येऊ लागल्या यावर तरुणाने असे सांगितले की मला सोडून दे. यावर त्या महिलेने असे सांगितले की जर तुला या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर मला पाच लाख रुपये दे.

त्या तरुणाकडे या सर्व प्रकरणाची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे असं तो सांगतो. पोलिसांनी त्या तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारावर गु*न्हा दाखल केला आहे आता यावर पुढील तपास करणे सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post