जेव्हा आपण एखाद्या चित्रपटाविषयी बोलतो तेव्हा आपण फक्त त्या चित्रपटातील अभिनेता किंवा अभिनेत्री विषयीच बोलत असतो. सगळ्यांना असं वाटतं की हेच दोघे एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्यांचा अभिनय आणि त्यांना मिळालेले पॉझिटिव्ह कॅरेक्टर मुळे आपल्याला अभिनेता किंवा अभिनेत्री आवडू लागतात. पण व्हिलन हा विषय आल्यास आपल्या मनात त्यांच्याविषयी ईर्षा निर्माण होते. त्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप काही राग निर्माण होतो. हा राग असा असतो की जागच्या जागेवर टीव्हीवरच हा राग काढावा असं काहींना वाटत असते.

व्हिलन लोकांना लोक खूपच खराब मानतात पण ते खऱ्या आयुष्यात तसे नसतात. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पुढे देखील जातात आणि गेलेले देखील आहेत. आता हेच पहा कि बॉलीवूड च्या चित्रपटांमध्ये जबरदस्त व्हिलन म्हणून पात्र साकारणारे काही व्हिलन कलाकारांच्या पत्नीदेखील खुप सुंदर आहे. आजच्या लेखातून आपण हेच पाहणार आहोत की बॉलीवूडमधील चित्रपटात व्हिलन म्हणून काम करणारे. अतिशय जबरदस्त दिसणारे परंतु त्यांची पत्नी किती सुंदर आहे हे तुम्हीच बघा.

प्रकाश राज:- "वेलकम टू गोवा सिंघम" हा डायलॉग म्हणणारा सिंघम चित्रपटातील खलनायक 'जयकांत शिर्के' तुम्हाला माहीतच असेल. यांचे खरे नाव प्रकाश राज असे आहे. प्रकाश राज यांची पत्नी 'पोनी वर्मा' खूपच सुंदर आहे. पोनी वर्मा यांचे प्रकाश राज बरोबर खूप सारे फोटो येत असतात.

आशुतोष राणा:- आशुतोष राणा हे जुन्या चित्रपटांमध्ये खूपच जबरदस्त ॲक्टींग करणारे आणि जबरदस्त दिसणारे व्हिलन समजले गेले आहे. आशुतोष राणा यांची पत्नी ही मराठी आहे त्यांनी मराठमोळ्या रेणुका शहाणे शी लग्न केलेली आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसते. दोघांच्या जोडीला फिलोसोफिकल जोडी असे देखील म्हटले जाते.

नवाब शाह:-नवाब शाह यांना आपण ओळखतच असाल यांनी डॉन 2 चित्रपटात नकारात्मक भूमिका म्हणजेच व्हिलनची भूमिका साकारली होती. यांनी 'सेक्रेड गेम' या वेब सेरीज मध्ये देखील काम केले आहे. यांनी पूजा बत्रा बरोबर लग्न केले होते त्यांचा संसार अगदी सुखाने सुरू आहे. पूजा बत्रा दिसायला खूपच सुंदर आहे.

के के मेनन:-के के मेनन यांनी बऱ्याचशा चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहे. यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या अगदी मनावर कोरलेल्या आहेत. त्यांनी निवेदिता भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलेले आहे. दोघांची जोडी अगदी जबरदस्त दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post