मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत ५ अश्या गोष्टी जे गरीब लोक सातत्याने त्यांच्या आयुष्यात करत असतात. पण श्रीमंत लोक ह्या गोष्टी कधीच करत नाही. ज्या वेळेस मी गरीब लोक म्हणतो याचा अर्थ गरीब मानसिकतेची लोक हे आधी लक्ष्यात घ्या. पण जी लोक त्याच्या मध्ये क्षमता तर अमर्यादित आहे पण त्यांना सर्व गोष्टी आयता पाहिजे असतात मेहनत करायला नकोत. जास्त वेळ न घालवता बघुयात कोणत्या आहेत त्या गोष्टी..

१:- गरीब लोक टीव्ही बघतात. श्रीमंत लोक पुस्तकाचे वाचन करतात मित्रांनो तुम्ही दिवसातील किती वेळ टीव्ही समोर घालवता तुमच्या प्रगती साठी शेवटचे कोणते पुस्तक तुम्ही वाचले होते. मी अनेक वेळा सांगितले आहे वॉरन बुप्फेत जगात ४ नंबर ला असलेली श्रीमंत व्यक्ती दिवसाला ५०० पाने वाचून काढतात. बिल गेट्स जगातील २ श्रीमंत व्यक्ती आठवड्याला एक पुस्तक वाचतात म्हणजे वर्षाला ५० पुस्तके वाचतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मित्रांनो तुम्ही कधी टीव्हीला BMW, Audi, Jaguar अश्या मोठ्या ब्रँड ची जाहिरात पहिली आहे का.? नाही ना..? कारण ज्या कंपनी ह्या कार विकतात त्यांना माहिती आहे ह्या मोठ्या ब्रँड ची कार घेणारी लोकं टीव्ही बघत नाही. काही प्रमाणामध्ये टीव्ही बघण वाईट नाही. पण दिवसातील ३ ते ४ तास तुम्ही टीव्ही जवळ असाल तर मग स्वतः च्या प्रगती साठी काम कधी करणार.

२:- गरीब लोक सतत तक्रार करत असतात. श्रीमंत लोक स्वतः जबाबदारी घेतात. गरीब मानसिकतेची लोक सतत तक्रार करण्यात वेळ वाया घालवतात. मग ते सरकारला दोष देतील अर्थव्यवस्थेला दोष देतील आपल्या बॉसला दोष देतील आपल्या नोकरीला दोष देतील. आपल्या मित्रांना सुद्धा दोष देतील. अश्या लोकांना तुम्ही कधीही भेटा सतत ते दुसऱ्यांना दोष देण्यात माहीर असतात. ह्या लोकांना स्वतः ची चूक कधीच दिसत नाही. ह्याच्या उलट श्रीमंत लोक स्वतः जबाबदारी घेतात. त्याची मान्यता असते माझ्या आयुष्यात जर काही समस्या असेल तर त्याला मीच जबाबदार आहे. कारण जबाबदारी घेणाऱ्या माणसामध्ये एक प्रकारे शक्ती निर्माण होते. आणि ह्याच शक्तीच्या आधारे तो आयुष्यामध्ये आलेल्या संकटावर तो मात करतो.

३:- गरीब लोकांनी असे वाटते त्यांना सर्वकाही माहिती आहे. श्रीमंत लोक सतत नवीन गोष्टी शिकत असतात. गरीब मानसिकतेच्या लोकांना वाटते त्यांना या जगातील सर्व ज्ञान आहे. त्यांना नेहमी जगासमोर आपले मात मांडायचे असते. मग ते राजकारणाबद्दल असेल, एखाद्या खेळाबद्दल असेल, समाजाबद्दल असेल, सरकार बद्दल असेल त्यांच्या बाजूला ज्या काही गोष्टी घडत असतील त्यांना त्याबद्दल मत मांडायचे असते. त्याच्या उलट श्रीमंत लोक अत्यंत नम्र असतात. त्यांना बोलायला कमी ऐकायला जास्त आवडते. ते नेहमी प्रश्न विचारत असतात. त्यांचा कल सतत नवीन गोष्टी शिकण्याकडे असतो. गरीब लोकांना प्रत्येक गोष्टीत मत का मांडायचे असते तुम्हाला माहिती आहे का..? त्यांना attention पाहिजे असते. त्यांना तुमचे लक्ष वेधून घायचे असते. त्यांना दाखवायचे असते ते किती ग्रेट आहेत.

४:- गरीब लोकांना वाटते पैसा सर्व दुःखाचे मूळ आहे. श्रीमंत लोकांना वाटते पैशाची कमी सर्व दुःखाचे मूळ आहे. मित्रांनो आपण बघतो जगामध्ये गुन्हेगारी वाढले आहे चोऱ्या दरोडे वाढले आहे. ह्याचे कारण एकच पैसा कमतरता. गरीब लोकांची मानसिकता असते. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ म्हणजे जेवढे आहे तेवढंच समाधानी राहीचे. जास्त पैसे कमावले की आपण वाईट मार्गाला लागू अशी त्यांची समजूत असते. पण पैसा हा दोन्ही कामा साठी वापरला जातो. चांगल्या कामासाठी सुद्धा आणि वाईट कामासाठी सुद्धा त्यामुळे पैसा वाईट किंवा चांगला नाही. पैसा हे एक साधन आहे. त्याचा कसा वापर करायचा हे सर्वस्वी पैसा कमावणाऱ्या अवलंबून असते. जर एका चांगल्या व्यक्तीने भरपूर पैसा कमाविला तर तो निश्चितच चांगल्या कामासाठी वापरेल. त्याचे उदा. म्हणजे आदरणीय रतन टाटा म्हणून पैसा सर्व दुःखाचे मूळ आहे हा विचार चुकीचा आहे.

५:- गरीब लोकांना शॉर्टकट मार्गाने पैसे कमवायला आवडतात. ज्याला लॉटरी मानसिकता देखील म्हणतात. गरीब लोकांना वाटते आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर काहीतरी लॉटरी लागली पाहिजे. म्हणून ते लॉटरी चे तिकीट काढतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे गरीब लोकं पैसे मिळवण्यासाठी सतत काहीतरी शॉर्टकट शोधत असतात. त्यांच्या मनाला माहिती असते की अश्या गोष्टी मध्ये यश मिळायची शक्यता खूप कमी आहे. पण शॉर्टकट च्या लोभा मुळे ते त्याच त्याच चुका करत राहतात. पण श्रीमंत लोकं मेहणीतीवर भर देतात. त्यांना माहिती असते मोठे यश मिळवायचे असेल तर त्याला शॉर्टकट उपलब्ध नाही त्याला एकाच पर्याय प्रचंड मेहनत करणे आणि यशाला आपल्या कडे खेचून आणणे. मित्रांनो ह्या होत्या त्या पाच चुका जे गरीब मानसिकतेची लोकं सतत करत असतात म्हणून ते श्रीमंत होत नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post