मौन हा एक उपाय आहे ज्यामुळे आतील जगाला तसेच बाह्य जगास मदत होते. या उपायाने मनाची अस्वस्थता नष्ट होऊ शकते आणि ज्यांना पूर्ण आयुष्य जगायचे आहे ते शांततेने मनाची शक्ती वाढवू शकतात. मौन अभ्यासाचे फायद:-योगासनामध्ये मौनतेला तेवढेच महत्त्व आहे. कार्यरत किंवा ऐहिक जीवनात शांतता सकारात्मक विचारांच्या विकासास कारणीभूत ठरते. शांतता आतील किंवा मानसिक सामर्थ्य देते.ध्यान, योग आणि शांततेचा निरंतर सराव केल्याने शरीरात रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते.बौद्ध धर्मात अनापानसती नावाची बौद्ध प्रथा आढळली. त्यांच्या मते, एखाद्याने काम करताना शक्य तितक्या शांत राहण्याचा सराव केला पाहिजे.काम करत असताना, आपल्याला श्वासोच्छवासाच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यास आणि कोणत्याही प्रतिसादांशिवाय काय पाहिले किंवा जे ऐकले जाते ते पाहण्यास सांगितले जाते.

अशाप्रकारे, कामाच्या वेळी मौन बाळगण्याचा सराव मनाला शांती आणि शक्ती देतो.याव्यतिरिक्त, ती व्यक्ती जास्त काळ आरामदायक, सतर्क आणि तणावमुक्त राहते. यामुळे, कामकाजात चुका होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.ध्यान आत्म्याचा आहार आहे. त्यामुळे सामाजिक मुल्ये, एक दुसऱ्यांची काळजी, जबाबदारी आणि अहिंसा आणि शांती वृध्दिंगत होते. ते आपापसात जोडण्यासाठी मदत करते. या मूल्यांमुळे तर ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना स्वीकार करण्यासाठी मदत होते.समस्त मानव जातीमध्ये कधीही आणि कश्यानेही कमी होणार नाही असा आनंद शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. ध्यानामुळे हि तृप्ती प्राप्त होते.आपल्या जीवनात सर्व काही ठीक चाललेले असून देखील आपण असहज होतो. ध्यान आपणास ज्ञात आणि अज्ञात अश्या दोन्ही तणावापासून मुक्ती देऊन विश्राम आणि स्थिरतेची अनुभूती देते जी आपण सर्वजण शोधत असतो.

थोडक्यात काय तर प्रामुख्याने आपल्या मनाला पवनकुक्कुटाप्रमाणे वारा येईल त्या दिशेला भरकटण्याच्या लागलेल्या सवयीने ही समस्या निर्माण झालेली दिसून येते.स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे असा बोलबालाही आपल्याला सर्वत्र ऐकू येतो.पण ध्यान करणे म्हणजे नेमके काय? इंग्रजीत ध्यानाला Meditation म्हटले आहे. Meditation या शब्दाच्या dictionary meaning नुसार Meditation is nothing but continuously thinking about something ! म्हणजेच सतत एकाच गोष्टीचा विचार करणे म्हणजेच ध्यान असा ध्यानाचा ढोबळ अर्थ !मग कुणी पैशावर ध्यान करत असेल तर कुणी खेळावर. अर्थात प्रत्येकजण कशाना कशाचा सतत विचार करीत असतो म्हणजेच ढोबळ अर्थाने ध्यानच करीत असतो.

विचार करणे हा मनाचा स्थायीभाव आहे मग त्याला चिरडून किंवा मारून आपल्याला जे साध्य करावयाचे आहे ते कसे साध्य करता येईल? मनाला आपला मित्र बनवूनच हे शक्य होईल.ज्याप्रकारे सुसाट वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाला योग्य दिशेने वळविले असता तिचा उपयोग जनकल्याणाकरिता करता येऊ शकतो त्याच प्रकारे आपल्या मनाचा नियमनाद्वारे आपल्याच कल्याणाकरिता उपयोग केला जाऊ शकतो.मनाचे नियमन त्याला योग्य विचाराची दिशा देऊन आणि योग्य विचारावर स्थिर करून ध्यानद्वारे सहज साध्य होऊ शकते.

पण जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. डोळे मिटून बसल्यावर आपल्या मनात अक्षरशः विचारांचं काहूर माजतं.म्हणजे डोळे उघडे असताना येणार नाहीत एवढे विचार डोळे बंद केल्यावर येतात. मग करायचं काय? अशावेळी आपण विचारांना अनाहूत पाहुण्यांप्रमाणे वागवायचं.जसे एखादी व्यक्ती नको असताना आपल्या घरी आल्यास आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अगदी तसेच आपल्या विचारांच्या बाबतीतही करायचे.म्हणजे आपोआपच विचारांची निर्मिती बंद होऊन मन निर्विचार होण्यास सुरुवात होते.

Post a Comment

Previous Post Next Post