मित्रांनो तुम्ही सध्या कितीही गरीब असू द्या किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कितीही बिकट असून द्या हे पाच गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक दिवस नक्की श्रीमंत होणार..१:- सतत बचतीचा विचार न करता उत्पन्न कसे वाढवता येईल याचा विचार करणे:-मित्रांनो आपण पाहतो की सामान्य माणसे सतत बचतीचा विचार करत असतात. काय केले तर माझे पैसे वाचतील सतत ह्याच विचार मध्ये ते गुंतलेले असतात. मग अशी माणसे पन्नास-शंभर रुपये वाचवण्यासाठी दोन-दोन तास बाजारामध्ये फिरतात. आता बचत करणे वाईट आहे असे मी म्हणत नाही. सतत बचतीचा जर तुम्ही विचार करत असाल तर अशाने तुमची मानसिकता कमी होत जाते. दुसरीकडे हुशार माणसे आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत्र कसा वाढेल याकडे लक्ष देतात. ही माणसे दोन-दोन तास बाजारामध्ये किंवा इतर दुसरीकडे वेळ वाया घालवत नाहीत. भलेही त्यांचे पन्नास शंभर रुपये जास्त गेले तरी चालतील. पण हाच वेळ ते नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरतात. ज्यामुळे ते जास्त पैसे कमवू शकतील. त्यांच्या डोक्यात सतत ह्याच विचार चाललेला असतो की आपले उत्पन्न कसे वाढेल. आणि असे म्हणतात ‘गरज ही शोधाची जननी आहे’एकदा माणसाने कधी इच्छा सुरू केली तर त्याला अनेक मार्ग दिसायला सुरुवात होते.

२:- तुम्हाला तडजोडीच्या आयुष्य जगायचा राग येतो:-ज्या वेळेस तुम्ही बघता जगा मध्ये लोक त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करत नाही. त्याचा तुम्हाला राग येतो. तुम्हाला माहिती असते तुमच्यामध्ये अमर्यादित क्षमता आहे. मी ह्या आयुष्यासाठी बनलेलो नाही. मी काहीतरी मोठे करण्यासाठी जन्माला आलो आहे. ज्यावेळेस असा विचार तुमच्या मनात येतो त्यावेळेस तुम्ही तर तडजोडीची आयुष्य जगण्यास नाकारतात. तुम्ही जबाबदारी उचलतात. प्रचंड मेहनत करता आणि तुमच्या स्वप्नाच्या आयुष्य जगायला सुरुवात करतात.

३:- तुम्हाला रिटायरमेंट प्लॅन आवडत नाही:-मित्रांनो च्या वेळेस तुम्हाला एकदा इन्शुरन्स एजंट रिटायरमेंट प्लॅन बद्दल सांगत असतो आणि तुमच्या मनामध्ये विचार येत असेल. की माझे घर घेण्यासाठी माझी four-wheeler घेण्यासाठी किंवा मला हवं ते करण्यासाठी मी माझ्या साठीची सत्तरीची वाट बघणार नाही मी माझ्या मेहनतीची जोरावर मी पुढच्या काही महिन्यातच मिळणार.असे विचार जर तुमच्या मनामध्ये येत असतील तर तुम्ही लवकरच श्रीमंतीकडे वाटचाल करत आहात. मित्रांनो येते मी रिटायरमेंट प्लॅन करू नका असे अजिबात म्हणत नाही. त्याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पण आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी साठीची सत्तरीची वाट बघणे हे चुकीचे आहे. आपल्यात इतकी क्षमता आहे की आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर काही महिन्यातच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यासाठी रिटायरमेंट ची वाट बघण्याची गरज नाही.

४:- तुम्ही श्रीमंत लोकांचे मनापासून खूप करतात त्यांच्या यशाचे कौतुक करतात:-मित्रानों जेव्हा एखादी व्यक्ती बीएमडब्ल्यू मधून किंवा मरसडी मधून बाहेर पडत असेल तेव्हा तुमच्या मनात कसले विचार येतात या माणसाकडे काळा पैसा आहे ह्याचे स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही. बापाच्या जीवावर उड्या मारतोय. हा खूप लालची माणूस आहे. की ह्याच्या उलट असे विचार येतात मी एक दिवस नक्की गाडी घेणार ह्या माणसांनी खरच खूप मेहनत घेतली असणार म्हणून हाय तो पर्यंत पोहोचला आहे मी मेहनत केली की मी सुद्धा तिथपर्यंत पोहोचेल जर तुमच्या मनात दुसऱ्या प्रकारचे विचार येत असतील तर नक्कीच तुम्ही श्रीमंती कडे वाटचाल करत आहात. मित्रांनो ज्या वेळेस एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्ती चा द्वेष करते त्याच्या मोठ्या घराचा द्वेष करते त्याच्या मोठ्या गाड्यांचा द्वेष करते. ह्या प्रकारे ती व्यक्ती स्वतःच्या मनाचे प्रोग्रॅमिंग करत असते. कितीला श्रीमंती मोठे घर मोठी गाडी तिच्या आयुष्यात नकोय मग अशा व्यक्तीने तिच्या आयुष्यात कितीही मेहनत केले तर त्याला यश मिळत नाही.

५:- तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आवडतात:-मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रातल्या नवनवीन गोष्टी शिकायला आवडत असतील. किंवा तुम्ही स्वतः वर नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च करत असाल. तर तुम्ही निश्चितच श्रीमंत कडे वाटचाल करत आहात. मी कुठेतरी वाक्य वाचले होते “आपले आयुष्य झाडासारखे असते” एकतर आपण प्रगती करत जातो. किंवा आपण सडत जातो जी व्यक्ती सतत नवीन नवीन गोष्टी शिकून आपल्या आयुष्यात प्रगती करते. त्या व्यक्तीला आयुष्यात काही कमी पडत नाही. मित्रांनो हे होते ते पाच गुण जे तुमच्या मध्ये असतील तर एक दिवस तुम्ही नक्की श्रीमंत होणार.लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Post a Comment

Previous Post Next Post