आपल्याला सगळयांना माहिती आहे की ह्या विश्वाचा निर्माता श्री कृष्ण आहे. श्री कृष्ण जेव्हा लहान होते तेव्हा खूप खोड्या काढत असत. गोपिकांची वस्त्र चोरणे असो किंवा दह्या दुधाने भरलेले मोठमोठाले भांडी चोरणे असो. अशाप्रकारच्या अनेक खोड्या श्री कृष्ण काढत. एकदा गोपिका नदीमध्ये अंघोळ करत होत्या तेव्हा कृष्णाने सगळ्या गोपिकांची वस्त्रे चोरली. आणि त्याच्या कडून कृष्णाने हे वचन घेतले की त्या येथून पुढे अंघोळ करतांना विवस्त्र होऊन अंघोळ करणार नाही.

सर्व जण असे म्हणतात की कृष्णाने गोपिकांची ही एक प्रकारची खोडी काढली होती. पण असे नाहीये कृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही संदेश मिळत असतो. त्यांनी काढलेल्या खोडी मागे काहीतरी उद्देश असतोच. कृष्णाने दिलेल्या शिकवणीतून लोक काही ना काही शिकत असतात त्यामुळे लोक श्री कृष्णाची भगवद्गीता सतत वाचत असतात त्यातून एक बोध घेत असतात. श्रीमद्भागवत गीतेतून लोकांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. जीवनातील सत्य समजते जीवन कसे जगावे याविषयी भागवत गीता मध्ये चांगले नमूद केले आहे.

जेव्हा गोपिका आपले वस्त्र काढुन अंघोळ करण्यासाठी नदीत उतरतात. तेव्हा भगवान कृष्ण सगळ्या गोपिकांची वस्त्रे चोरतात. जेव्हा गोपिका त्यांची वस्त्रे सापडवतात तेव्हा त्यांना आपली वस्त्रे सापडत नाही. नदीच्या शेजारी असलेल्या एका झाडावर भगवान श्री कृष्ण गोपिकांची वस्त्रे घेऊन बसलेले असतात. गोपिका नदीतूनच आवाज देतात कान्हा आमचे वस्त्र आम्हाला परत दे, तेव्हा श्री कृष्ण त्यांना म्हणतात की जर तुम्हाला तुमचे वस्त्र हवे असतील तर नदीच्या बाहेर येऊन घ्या. पण गोपिकांना हे शक्य नव्हते त्यामुळे त्या श्री कृष्णाला पुन्हा पुन्हा विनवणी करतात की आम्हाला आमचे वस्त्र द्या.

गोपिका कृष्णाला विनवणी करताना म्हणतात की आम्ही जेव्हा येथे नदीवर अंघोळ करण्यासाठी आलो होतो तेव्हा येथे कोणी नव्हते त्यामुळे आम्ही अंघोळ केली पन भगवान श्री कृष्ण त्यांना म्हणतात की मी प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक कणाकणात बसलेलो आहे. भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात की येथे आकाशात उडणारे पक्षी देखील होते जमिनीवरील कीटक देखील होते आणि तुम्ही म्हणता की येथे कोणीही नव्हते.

गरुड पुराणात असे सांगितले आहे की आपण अंघोळ करताना आपल्या शेजारी म्हणजे आपल्या आसपास आपले पूर्वज असतात. जे आपल्याला दिसत असते ते त्याच्या जागेवर असते भौतिक दृष्ट्या ती वस्तू त्या ठिकाणी असते परंतू काही सूक्ष्म असते ते आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही याचा अर्थ असा नाही की ती वस्तू अस्तित्वात नसते. अनेक ग्रंथामध्ये विवस्त्र होऊन आंघोळ करण्यास सक्त मनाई केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post