मित्रांनो आजच्या तारखेला भारतामध्ये कोरूना चे साडे आठ लाखांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा आकडा अडीच लाखाच्या वर गेला आहे. त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर आहे जर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण सहज कोरोणावर मात करू शकतो. आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला पाच अश्या साध्या आणि सोप्या गोष्टी सांगणार आहे. ज्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी पडतील. कोरोना पासून जर वाचायचे असेल तर आपल्याला सध्या एकच गोष्ट करायला पाहिजे. ती म्हणजे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे. म्हणून तुम्हाला विनंती करतो की हा लेख शेवटपर्यंत वाचा.

१:- चांगली झोप घेणे.मित्रांनो कमी झोप घेणे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करते. सध्या अनेक लोक घरी असल्यामुळे रात्री उशीरपर्यंत टीव्ही बघत असतात. सोशल मीडियावर असतात पण ही रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय तुमच्या रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम करू शकते. म्हणून रोज आपण पुरेशी म्हणजे सात तास तरी झोप घेतली पाहिजे.२:- मन प्रसन्न ठेवा.मित्रांनो आपले मन सतत टेन्शन आणि टेन्शन मध्ये असेल तर त्याचा परिणाम आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर होऊ शकतो मला मान्य आजच्या धावपळीच्या जगात माणूस पूर्णपणे तणावमुक्त होऊ शकत नाही. पण आपण ह्या तान तणावाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम टाळू शकतो. त्या साठी आपण मेडिटेशन दीप ब्रेठींग किंवा आपला जो काही छंद असेल त्यावर आपण काम केले पाहिजे. जेणेकरून तुमचे मन जास्तीत जास्त प्रसन्न राहण्यासाठी मदत होईल.

३:- पौष्टिक आहार घ्यासध्या सर्व हॉटेल स्वीट मार्ट बंद असल्यामुळे बाहेरची खायचा प्रश्नच येत नाही. तरीसुद्धा काही लोकांना जास्त तळलेले मसालेदार खाण्याची सवय असते. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर होतो . म्हणून जास्तीत जास्त पाले भाज्या आणि फळांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे आवश्यक ती जीवनसत्वे आपल्या शरीराला मिळतील. आणि रोज दहा मिनिटे तरी आपण सूर्यप्रकाशामध्ये गेले पाहिजे.४:- शरीराची सतत हालचाल करत राहा.मित्रांनो मी माझ्या सर्व लेखांमध्ये सांगितला आहे की दिवसा मधून आपण 30 मिनिटे तरी व्यायाम केला मग ते सूर्यप्रकाश असेल चालणे असेल किंवा कुठलाही व्यायाम प्रकार यामुळे शरीराची चांगली हालचाल होते. आपण नित्यनियमाने केला पाहिजे त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये सेरोटनिन (serotonin) आणि डोपामाइन (dopamine) ही रसायने तयार होतात. ज्यांना आपण आनंदाचे रसायन म्हणतो आणि दुसरे म्हणजे व्यायाम केल्यामुळे आपल्या आरोग्यही टिक राहते. त्यामुळे आपण आपली कामे न थकता करू शकतो. आरोग्य प टिक असणे म्हणजे काय आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे.५:- टॉक्सिन चे सेवन कमी करणे टॉक्सिन्स म्हणजे धूम्रपान दारू गुटखा तंबाखू ह्या गोष्टींचे सेवन कमी करणे किंवा शक्य असल्यास पूर्णपणे बंद करणे.आता धूम्रपान गुटखा दारू सेवन केल्यामुळे आपल्या रोग प्रतिकार शक्तीचे काय होत असेल हे मला वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो ह्या होत्या सोप्या आणि अत्यंत प्रभावी गोष्टी ज्याची आपण काळजी घेतली तर आपली रोग प्रतिकारशक्ती नेहमी चांगली राहील.

Post a Comment

Previous Post Next Post