
तुम्हांला १९९० साली आलेला ‘धडाकेबाज’ चित्रपट तर आठवत असेलच. महेश कोठारे ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ह्या चित्रपटांत लक्ष्मी कांत बेर्डे ह्यांनी डबल रोल केला होता. ज्यात लक्ष्याला एक बाटली सापडते आणि त्या बाटलीत छोटा गंगाराम अडकलेला असतो. जो अगदी लक्ष्या सारखा दिसतो. त्या बाटलीत जोपर्यंत वाळू असते तोपर्यंत तो लक्ष्याची मदत करतो. जेव्हा जेव्हा लक्ष्या संकटात सापडतो तेव्हा तेव्हा हा गंगाराम त्याला त्या परिस्थितीतून सोडवतो. परंतु जेव्हा ती वाळू संपेल तेव्हा तो निघून जाईल.
ह्या भावनिक कथेवर चित्रपटाचा पाया हाेता.धडाकेबाज चित्रपटांत कवट्या महाकाळ कोण होता ह्याचे उत्तर अजून २५ वर्षे झाली तरी मिळाले नाही. मग ह्यावर शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर सांगितले कि सुरुवातीला कवट्या महाकाळची भूमिका ‘बिपीन वारती’ह्या कलाकाराने साकारली होती. बिपीन वारती बद्दल सांगायचं झालं तर ते अभिनेते आहेतच परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी , ‘चंगू मंगू’ आणि‘डॉक्टर डॉक्टर’ ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे.

अगोदरच्या काळात कवट्या महाकाळ ह्याची भूमिका बिपीन वारती ह्यांनी केली. परंतु त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना ह्या चित्रपटासाठी वेळ देता आला नाही. त्यांना पुढे ह्या चित्रपटांत काम न करता आल्यामुळे तब्बल आठ कलाकारांनी हि भूमिका साकारली होती. इतकंच काय, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांना सुद्धा त्या आठ कलाकारांची नावे आठवत नाहीत. परंतु हि भूमिका सुरुवातीला साकारणारा आणि त्याचा आवाज हा बिपीन वारती ह्यांचाच आहे, असे महेश कोठारे ह्यांनी सांगितले.
Post a comment