सर्वजण देवाची पूजा करत असतात पण पूजा करताना अशा काही घटना घडतात याविषयी आपल्याला काहीच माहित नसते. तर आज आपण बघणार आहोत की पूजा करताना ज्या घटना घडतात तर तेव्हा काय होते.देवाची पूजा करतांना तुमच्या डोळ्याला पाणी येते का? किंवा तुमचे डोळे लाल होतात का? तुम्हाला झोप येते का? पूजा करताना तुम्हाला जांभळी येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर हो असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी का होतात याचे सविस्तर विश्लेषण केले आहे कृपया संपूर्ण वाचा.

पूजा करताना झोप येणे जांभळी येणे यामागे देखील खूप रहस्य आहे. तुम्हाला काय वाटते या सर्व गोष्टी होते म्हणजे या शुभ आहेत की अशुभ? शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो भक्त देवाची मनोभावाने पूजा करतो तो पूजेमध्ये तल्लीन होत असतो. आपले तन मन सारे तो पूजेमध्ये झोकून देत असतो हे सर्व केल्यावर देवही आपल्याला फळ देतो. म्हणजे या केलेल्या पूजेचे एक सार्थक होते हे नक्की.

पण जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्या व्यक्ती च्या मनामध्ये खूप सारे विचार सुरू असतात. एका पेक्षा अनेक गोष्टी मनामध्ये घडत आहेत आणि ती व्यक्ती पूजा करत आहेत पूजा करणार्‍या त्या मनुष्याचे पूजेत लक्ष नाही त्याचे लक्ष इतरच कुठल्यातरी गोष्टीवर आहे. त्याच्या मनात विचारांची गुंतागुंत वाढत चाललेली असते. त्यामुळे त्याला झोप येऊ लागते.

जर तुम्ही काही संकटात असाल आणि देवाची पूजा करत असाल तर तुम्हाला या गोष्टी नक्की होतील. कारण तुमचे मन एका जागेवर राहू शकत नाही. पूजेच्या वेळी असे संकेत देण्याविषयी शास्त्रात आणि पुराणात याविषयी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला पूजेच्या वेळी झोप येत असेल तर ईश्वरी शक्ती तुम्हाला काहीतरी अशुभ संकेत देत आहेत.पण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनापासून केलेली कोणतीही गोष्ट नेहमी सफल होत असते.

काही वेळेला असे देखील म्हटले जाते की पूजेच्या वेळेला तुम्हाला येणारी जांभळी आणि डोळ्यातून येणारे पाणी किंवा झोप याचे कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता असू शकते. जेव्हा कधी तुम्हाला अशा गोष्टी होत असेल तुमच्या शरीराला जडत्व आले असेल तर समजून घ्या की तुमच्या अवती भोवती कुठलीतरी नकारात्मक शक्ती असू शकते जी तुमच्या मनाची एकाग्रता भंग करते. तुमचे चित्त विचलित करीत असते.ही माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. याद्वारे कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.

1 Comments

  1. आम्हाला तुमची माहिती दरोरोज देत जा

    ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post