
मित्रांनो जेव्हा जेव्हा मी माझ्या नोकरी करणारे मित्रांनो किंवा ओळखीच्या लोकांना भेटतो त्यातील नव्वद टक्के लोक मला नेहमी सांगत असतात की आम्हाला बिजनेस करायची खूप इच्छा आहे आम्हाला नोकरीचा खूप वैताग आला आहे. पगार वाढ नाही प्रमोशन नाही पाहिजे तेवढी सेविंग नाही वगैरे वगैरे पण तुम्हाला सांगतो कोणीही रिस्क घ्यायला तयार नसते दर सहा महिन्यांनी मला त्या लोकांकडून तीच वाक्ये ऐकायला मिळतात क्या मला बिजनेस करायची इच्छा आहे पण कोणी साधा प्रयत्नही करत नाही की खरच बिझनेस करायचा झाला तर त्यासाठी नक्की काय करावे लागेल नोकरी करता करता ते जमेल का कोणी माहिती सुद्धा काढत नाही. पण श्रीमंत प्रत्येकाला व्हायचे आहे मोकळा वेळ प्रत्येकाला पाहिजे वर्ल्ड टूर सर्वांना करायची आहे त्यासाठी किंमत मोजायची तयारी नाही आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला लोक करत असलेले चार चुका सांगणार आहे जा तुम्ही सुद्धा करत असाल. तर आयुष्यभर तुम्हाला कष्ट आणि कामच करावे लागेल हा लेख खूप फायदेशीर आहे त्यामुळे शेवटपर्यंत वाचा१:- स्वतःच्या क्षमतांवर विश्वास नसणे मित्रांनो ह्या जगात अनेक हुशार आणि प्रतिभावंत लोक आहेत त्यांना स्वतःच्या श मतांवर विश्वास नाहीये.आणि ह्याच भिती मुळे ते एखाद्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी आयुष्य घालवतात अशा लोकांचे लक्ष सतत आपल्या मध्ये काही कमी आहे यांच्याकडे जाते ते कधी स्वतःच्या क्षमतांवर महत्त्व देत नाही. लहान असताना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांना एक आजार झाला होता त्यांना शिकवले लवकर कळत नव्हते बाकीच्या मुलांपेक्षा त्यांनी उशिरा बोलायला सुरुवात केली होती एवढेच काही कॉलेजमध्ये असताना ते परीक्षेमध्ये नापास झाले होते पण जेव्हा त्यांना त्यांची फॅशन सापडली त्यांच्यामध्ये असलेले क्षमतांची जाणीव झाली तेव्हा त्याने मागे वळून बघितले नाही पुढचा सर्व इतिहास तुमच्यासमोर आहे.जगामध्ये हुशार व्यक्तींच्या लिस्टमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे नाव आदराने घेतले जाते. थॉमस एडिसन यांनासुद्धा लहानपणी मंदबुद्धी बालक म्हणून शाळेतून काढून टाकले होते. पण त्या थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लाववून पुर्ण जगाला प्रकाश दिला. मित्रांनो आपल्या वृत्तीमध्ये अमर्यादित साम सामर्थ्य आहे. हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे. मला मान्य आहे आपल्या सर्वांमध्ये काही दुर्गुण असतात काही दोष असतात पण त्या दुर्गुणांवर दोषांवर आपण काम केले पाहिजे. तरच आपली प्रगती शक्य आहे.
२:- पैशाचे व्यवस्थापन नसणे म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट नसणेमित्रांनो बऱ्याच नोकरी करणारे लोकांचे पैशाचे व्यवस्थापन एकतर चुकीच्या मार्गाने असते किव्हा ते पण नसते. तुम्ही अनेक लोकांच्या तोंडून ऐकले असेल. आमचा पगार झाला की कसा संपून जातो आम्हाला कळत नाही. त्याचे मुख्य कारण पैशाचे व्यवस्थापन नसणे पैशाचे व्यवस्थापन म्हणजे फक्त हिशोब ठेवणे नाही पैशाचे व्यवस्थापन म्हणजे भविष्य काळा साठी पैशाचे व्यवस्थित नियोजन करणे पुढच्या एका वर्षामध्ये तीन वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये तुमचे काय प्लॅन्स आहेत मग ते मुलांचे शिक्षण असेल तुम्हाला घर घ्यायचं असेल तुम्हाला एका ठिकाणी फिरायला जायचं असेल. किंवा रिटायर्ड लाईफ असेल. या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करावे लागेल. सेविंग कुठे करायची कुठे जास्त रिटर्न्स मिळतील उत्पन्नाचा दुसरा मार्ग अश्या अनेक; गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण हे पैशाचे व्यवस्थापन आपल्याला शाळेत कोणी शिकवत नाही. आणि मोठे झाल्यावर आपल्याला याचे महत्व कोणीच सांगत नाही. पण प्रत्येकाने जबाबदारी घेऊन याचा अभ्यास केला पाहिजे.
३:- संस्कार बऱ्याच लोकांची त्यांच्या मित्रांकडून किंवा कुटुंबाकडून मनाचे brain wash होते. आणि चुकीचे विचार मनावर बिंबवले जातात जशी की आपली लायकी नाही श्रीमंत होण्याची आपण आहोत तिथेच समाधानी आहोत. श्रीमंत लोकांमध्ये काहीतरी विशेष असते. अश्या अनेक चुकीच्या समजुती मनावर कोरल्या जातात. आणि अशा चुकीच्या विचारांमुळे ती व्यक्ती आयुष्यामध्ये काहीतरी मोठी करायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. एखादा मुलगा गरिबीतून शिक्षण घेऊन प्रगती करतो. त्याला चांगली नोकरी मिळतील पण नंतर तो त्या नोकरीवरच समाधान मानतो. त्याला असे वाटते पूर्वीपेक्षा माझी परिस्थिती खूप चांगली आहे. आणि अशाप्रकारे तो कम्फर्ट झोन मध्ये जातो. अशा चुकीच्या विचारांची शिकार तुम्ही सुद्धा झाला असाल. तर आताच आवड व्हा.४:- आता खूप उशीर झाला आहे असा विचार करणे मित्रांनो सध्या लोक तिसी च्यावर गेले किंवा चाळीसच्या वर गेले त्यांना असे वाटते की त्यांचे खूप वय झाले आहे कोणतीही नवीन गोष्ट करायला आता खूप उशीर झाला आहे. फक्त या एका चुकीच्या विचारांमुळे ते काही वेगळ करायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. पण इतिहास सांगतो काही अपवाद वगळता लोकांना त्यांच्या आयुष्यात मोठे यश वयाच्या चाळीशी पन्नाशी किंवा साठीनंतर मिळते कोलेनियर सँडर्स यांनी आपल्या वयाच्या 62 व्या वर्षी आपला चिकन पदार्थ विकायचा व्यवसाय चालू केला आणि जेव्हा ते जग सोडून गेले तेव्हा त्यांचा व्यवसाय ४८ देशांमध्ये पसरला होता. याची नेटवर्थ 5.९ बिलियन डॉलर इतकी होती. आणि तो व्यवसाय म्हणजे केएफसी चे रेस्टॉरंट जे आज दीडशे देशांमध्ये आहे अशी मी अनेक उदाहरणे देऊ शकतो ज्यांनी वयाचे पन्नाशीनंतर नवीन काहीतरी करायला सुरुवात केली आणि मोठे यश मिळवले. म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही फक्त इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी पाहिजे. मित्रांनी ह्या होत्या त्या चार चुका जी कोणतीही व्यक्ती करत असेल तर त्याला आयुष्यभर कष्ट आणि काम करावे लागेल
Post a comment