अँटिव्हायरस कंपनीमध्ये quick Heal हा एक मोठा ब्रँड आहे असा चुकूनही कम्प्युटर ऑपरेटर असेल त्याला quick heal बद्दल माहिती नाही. एक साधारण गरिब मुलगा जो मुजरा चे काम करायचा. पुढे जाऊन quick heal कंपनीचा फाउंडर बनला. एवढा मोठा बदल कसा झाला हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. प्रेरणा जरूर मिळेल. ह्या लेखाचे हिरो आहेत कैलास काटकर त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1966 साली रहिमतपूर येथे झाला. सातारा जिल्ह्यातील हे गाव तुम्हाला कदाचित आठवत असेल. कैलासाचे वडील फिलिप्स कंपनी मध्ये मशीन सेक्टरचे काम करत होते. कैलास व त्याच्या भावाला मशीनचे लहानपणापासूनच येड होते. कोणत्याही मशीन ला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरी त्याला रिपेअर करायला कैलास व त्यांचे भाऊ तत्पर होते.

लहानपणापासूनच कैलास काम करत होते. दुकानाची सफाई पासून ते चहा विकणे पर्यंत यांनी काम केले होते. कारण त्यांना रिपेरिंग शिकण्याची इच्छा होती कैलास इयत्ता दहावीची परीक्षा दिल्या नंतर शाळा सोडून रेडिओ व कॅल्क्युलेटर रिपेअर करण्याच्या दुकानात काम करायला सुरुवात केली.काही दिवसांमध्ये त्यांना रिपेरिंग चे स्पेशल ट्रेनिंग देण्यात आले. तेथे त्यांना बिझीनेस ची चांगली आयडीया आली. बिझनेस कसा चालतो ते त्यांना शिकायला मिळाले 1990 चाली त्यांनी रेडिओ व कॅल्क्युलेटर रिपेरिंग करायचे दुकान चालू केले. एका बँकेमध्ये कॅल्क्युलेटर रिपेरिंग चे काम करण्यास गेल्याल्या कैलास ने जेव्हा टीव्ही सारखे मशीन पाहिले. त्यावर काम करता येत होते. कैलास ला तेव्हाच कळले होते की कम्प्युटरला पुढे खूप मागणी येणार आहे. या वर आपण करू शकतो. १९९३ सालि CAT Computer Services या नावाने कम्प्युटर मेंटेनेस काम सुरू केले. पहिल्याच वर्षी त्यांचा टर्नओवर एक लाखापेक्षा जास्त झाला. जसजसा इंटरनेटचे प्रमाण वाढत गेले तसतसे व्हायरसचे प्रमाण वाढले. कैलास कडे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम वर कोणतेही उपाय नव्हते. शेवटी कैलास ने त्याच्या भावाला सॉफ्टवेअर फिल्ड मधून ग्रॅज्युएशन करण्याचा सल्ला दिला. दोघांनी मिळून स्वस्त अँटीव्हायरस चा शोध लावायला सुरुवात केली. अथक परिश्रमातून शेवटी त्यांनी एक एंटीवायरस शोधून काढला.

अँटिव्हायरस चांगला चालत होता. 1995 साल quick heal चा उदय झाला. वर्षातच 1996 सली कंपनीचा टर्नओवर बारा लाखांपर्यंत पोहोचला. मार्केटमध्ये नाव कमवण्यासाठी खूप प्रॉब्लेम येऊ लागले. एक दिवशी फायनान्शिअल प्रॉब्लेम मुळे कंपनी बंद करण्याची वेळ आली. पण संजय ने योग्य निर्णय घेऊन मार्केटिंगसाठी काही प्रोफेशनल लोकांची भरती केली. तेव्हापासून quick heal पुन्हा आकाशाला गवसणी घालायला लागले . बिझनेस वाढवण्यासाठी 2002 सालं पुण्यामध्ये 25 लाखाचे ऑफिस खरेदी केले. 2003 मध्ये नाशिकला ब्रांच ऑफिस काढले. त्याबरोबर सर्व देशात मध्ये ब्रांच ऑफिस खोलले. त्याचबरोबर कंपनी ने कम्प्युटर स्क्रीन मोबाइल सिक्युरिटी मध्ये यांसारख्या क्षेत्रांमध्ये पदार्पण करण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये कंपनीचे नाव बदलून Quick Heal technology Pvt.LTD असे केले. 2008 मध्ये quick heal मायक्रोसॉफ्टचा सर्टिफाइड पार्टनर बनला.

2010 मध्ये कंपनीला साठ करोडो रुपयांचे लोन मिळाले. त्यातून विदेशात ही ब्रांचेस ओपन करून quick heal ने आपला विस्तार केला. आज की quick heal चे 36 पेक्षा जास्त सिटीमध्ये तेराशे पेक्षा जास्त कामगार काम करतात. 71 लाखापेक्षा जास्त quick heal चे ऍक्टिव्ह यूजर आहेत. व शंभर देशांमध्ये quick heal चा वापर होतो. देशभरामध्ये वीस हजार पेक्षा जास्त चॅनल पार्टनर डिस्ट्रीब्युटर्स व रिटेलर आहेत. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट व लाईक जरूर करा.

1 Comments

Post a comment

Previous Post Next Post