मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण गणपती बाप्पा यांच्या आयुष्य वरून पाच शक्तिशाली गोष्टी शिकायला मिळणार आहेत. ह्या पाच गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात उतरवल्या तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला हवं ते मिळेल फक्त तुम्हाला विनंती करेन की हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण प्रत्येक शिकवण आयुष्य बदलणारी आहे.

१ :- गणपती बाप्पा चा अर्धा दंत आपल्याला शिकवण देतो की आयुष्यात कधीच हार मानू नका.मित्रांनो आपण पाहिले असेल की गणपती बाप्पा चा एक दंत पूर्ण आहे व एक अर्धा आहे ह्याच्या मागे गोष्ट अशी आहे की एकदा व्यास ऋषी नी गणपती बाप्पांना विचारणा केली की मला महाभारत लिहायचे आहे तू ते लिहिशील का गणपती बाप्पा लिहायला तयार झाले. व्यास ऋषींनी एक अट ठेवली की मी एकदा महाभारत सांगायला सुरुवात केली की तुला ते न थांबता लिहायचे आहे. आता महाभारतामध्ये शेकडो कथा आणि लाखो शब्द होते. बाप्पांनी अट मान्य केली. कितीही विघ्ने आली तरी लिहायचे थांबणार नाही. व्यास ऋषींनी महाभारत सांगायला सुरुवात केली बाप्पा आपल्या लेखणीने एकदम वेगात लिहू लागले. बाप्पांची लिहायची गती पाहून व्यास ऋषी सुद्धा चकीत झाले. आणि वेगाने लिहिता-लिहिता अचानक बाप्पांची लेखणी तुटली ज्याला आजच्या भाषेत आपण पेन म्हणतो. आता काय करणार. बाप्पानी एका क्षणाचाही विचार न करता आपला एक सुळ/दंत तोडला व त्या दंताने लिहायला सुरुवात केली. पण ते लिहायचे थांबले नाहीत. मित्रांनो ह्या गोष्टीवरून आपण एक मोठी शिकवण घेऊ शकतो. ‘आयुष्यात कधीच हार मानायची नाही’ आपले लक्ष पूर्ण करताना कितीही अडचणी आल्या संकटे आली तरी सुद्धा आपल्याकडे ची साधने आहेत त्याचा वापर करून पुढे जात राहायचे.

२ :- गणपती बाप्पांचे कान शिकवण देतात. ऐका जास्त आणि बोला कमी.मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत. कारण गणपती बाप्पा जास्तीत जास्त ज्ञानाला भर देतात. आणि जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला बोलणे कमी आणि जास्त ऐकावे लागते. कारण आपण बघतो जो माणूस वायफळ बडबड करतो त्याला समाजात जास्त किंमत नसते पण की व्यक्ती संयमी असते प्रमाणामध्ये बोलते. त्या व्यक्तीला सगळीकडे मान दिला जातो. शिवाय अनेक वेळेला एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातली काही दुःख सांगत असते तेव्हा आपण त्याचे ऐकून घ्यायच्या ऐवजी त्यांना उपदेश देऊन मोकळे होतो पण त्यावेळेस अशा व्यक्तींना त्यांचे कोणीतरी ऐकून घेणारे हवे असते. म्हणून मित्रांनो आज या जगात ऐकणारे व्यक्तींची जास्त गरज आहे.

३ :- तुमचे आई-वडील तुमचे सर्वस्व आहेत.शंकर आणि पार्वती ने ठरवले आपली दोन मुले कार्तिक आणि गणेश त्यांची परीक्षा घ्यायची. ते दोघांना सांगतात जो सर्वात आधी तीन वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला जादूचे फळ दिले जाईल जे फळ त्या व्यक्तीला ब्रम्हांडातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून देईल आणि सर्वात महत्वाचे त्याला अमर बनवेल हे ऐकताच कार्तिक मध्ये सर्वात जास्त उत्साह निर्माण झाला. त्याला ही स्पर्धा जिंकायची होती त्यामुळे त्याने लगेच प्रदक्षिणेला सुरुवात केली. गणपती बाप्पा हुशार होते त्यांना आपल्या संस्थेची पूर्ण जाणीव होती. त्यांना माहिती होते आपले वाहन उंदीर कार्तिक चे वाहन मोरा बरोबर स्पर्धा नाही करू शकणार नाही. गणपती बाप्पा विचार करू लागले त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे पाहिले आणि त्यांना जाणीव झाली की माझ्यासाठी माझे जग पृथ्वी सर्वकाही माझे आई-वडीलच आहे. मग मी कशाला बाकीचे जग फिरण्यात वेळ वाया घालू आणि अशाप्रकारे गणपती बाप्पानी तीन प्रदक्षिणा आपल्या आई-वडिलांना घातल्या. आणि मोठ्या शिताफीने त्यांनी कार्तिकचा पराभव केला. म्हणून मित्रांनो जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांना सर्वस्व मानते त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करते त्या व्यक्तीला आयुष्यात काहीच कमी पडत नाही.

४ :- बाप्पांचे मोठे डोके शिकवण देते आपण आयुष्यात नेहमी मोठे विचार केले पाहिजे.मित्रांनो आपण आयुष्यात मोठे विचार करायला सुद्धा घाबरतो मी अशी अनेक लोक पाहिले आहेत. की त्यांचे म्हणणे असते की आम्ही खाऊन-पिऊन सुखी आहोत. आम्हाला आता जास्त कसलीच गरज नाही. आणि अशा विचारांमुळे माणूस आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. पण गणपती बाप्पांची डोके मोठे आहे ते आपल्याला शिकवण देत असते की आयुष्यात नेहमी मोठा विचार करा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल नेहमी टॉप ला जायचा विचार करा. नोकरीमध्ये असेल तर टॉप चा विचार करा व्यवसायामध्ये असेल तर टॉप चा विचार करा. विद्यार्थी असाल तर अभ्यासमध्ये टॉप ला जायचा विचार करा सांगायचा मुद्दा काय तर आयुष्यात नेहमी टॉप चा विचार करा. कारण मोठा विचारच तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो.

५ :- नेहमी नम्र रहा आणि समोरच्याचा आदर करा.गणपती बाप्पांचे वाहन उंदीर आहे आता बघा गणपती बाप्पांचे शरीर केवढे मोठे आणि त्यामानाने उंदीर किती लहान आहे. तरीसुद्धा गणपती बाप्पाने उंदरा सारख्या एकदम छोट्या प्राण्याला कमी न लेखता त्याला प्रेमाची वागणूक दिली त्याचा आदर केला. ह्यामधून गणपती बाप्पा किती विनम्र आहेत हे दिसून येते. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कोणाला कमी न लेखता कामा नये. आपण सुद्धा प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. आणि आपला स्वभाव नेहमी नम्र ठेवला पाहिजे.मित्रांनो ह्या होत्या त्या पाच गोष्टी ज्या आपण गणपती बाप्पा कडून शिकले पाहिजे गणपती बाप्पा बदल च्या ह्या गोष्टी अनेक लोकांना माहिती नाही त्यामुळे हा लेख जास्तीत जास्त ह्या दहा दिवसांमध्ये शेअर करा जेणे करुन गणपती बाप्पांचे खरे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कोणती शिकवण आवडली कमेंट करून नक्की सांगा..

Post a Comment

Previous Post Next Post