भारतीय क्रिकेट टीम चे कॅप्टन विराट कोहली यांना न ओळखणारा क्वचितच एखादा सापडेल. त्यांचा फॅन वर्ग खूपच मोठा आहे. सोशल मीडियावर त्‍यांचे मिलियंस मध्ये फॉलोअर्स आहेत. विराट कोहली यांचे लहानपणीचे दोस्त यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की सुरुवातीच्या दिवसात विराट जेव्हा लहान होता तेव्हा त्याला ऋतिक रोशन हा हिरो म्हणून आवडत होता. विराटच्या मित्राने हा फोटो त्याच्या सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आणि या फोटोच्या कॅप्शन मध्ये असे लिहिले आहे की " बघ भाऊ विराट मला काय मिळालंय, काही जुन्या आठवणी"🤣🤣,❤️ #Viratkohali #Frindsship #frinds #cricket #ipl"

या पोस्टवर विराटच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या. त्यावर एका चाहत्याने असे लिहिले की ऋतिकचा अर्थ ऋतिक रोशन असा आहे का? यावर विराटच्या मित्राने हो अशी कमेंट केली. यावरून असे समजते की भारतीय क्रिकेट टीम चे कॅप्टन विराट कोहली हे ऋतिक रोशन यांचे चाहते होते. ही पोस्ट जेव्हापासून सोशल मीडियावर अपलोड केली आहे तेव्हापासून विराट कोहलीचे आणि ऋतिक रोशन चे फॅन पोस्ट शेअर करत आहेत. यावर आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत. हे तर सगळ्या जगाला माहिती आहे की ऋतिक रोशन खूप लोकप्रिय अभिनेता आहे. त्यासोबतच तो एक सुंदर डांसर सुद्धा आहे. त्याचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोवर्स देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

ऋतिक रोशनच्या चित्रपटांना लोकांद्वारे खूप सारा प्रतिसाद मिळतो. त्याचे चित्रपट खूपच आवडीने पाहिले जातात. ऋतिक रोशन आपल्या प्रत्येक अभिनयात एक अभिनयाची जादू टाकत असतो.भारतीय क्रिकेट टीम चे कॅप्टन विराट कोहली हे देखील सोशल मीडियावर खूप फेमस आहेत. विराटचे ही फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. बॉलिवुडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याशी लग्न केल्यावर तर विराटचे बॉलीवुडमध्ये देखील नाव येऊ लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post