असे पाहिले जाते की काही लोकांच्या तोंडातून खुपच दुर्गंधी येत असते. या लोकांनी बोलण्यासाठी आपले तोंड उघडले की खूपच घाण वास तोंडातून येत असतो. तुमच्याशी सुद्धा असे होत आहे का? की तुमच्या तोंडातून देखील घाण वास येत आहे का? तर मग हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कशाप्रकारे तोंडातून येणारी दुर्गंधी आपण थांबवू शकतो या लेखातून आपल्याला समजून जाईल. असे पाहिले जाते की लोक दातांची खूप स्वच्छता ठेवतात पण तरीदेखील तोंडातून दुर्गंधी येत राहते. परंतु तुम्हाला वाटत असेल की दात चांगले न घासल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येत असते परंतु याचे दुसरे अनेक कारणे असू शकतात. जसे की हे पोटा संबंधित दुखण्यामुळे देखील होऊ शकते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे खूप वेळा लोकांसमोर बेशरम व्हावे लागते.

या दुर्गंधी ला अगदी मुळातूनच काढून टाकायला हवे. या लेखात दिलेल्या काही घरगुती उपाया द्वारे तुम्ही तोंडातुन येणारी दुर्गंधी थांबवू शकता. तर जाणून घेऊयात काय आहेत हे घरगुती उपाय.

मिठाच्या पाण्याने करा गुळण्या :- तोंडातून निघणार्‍या दुर्गंधीचा थांबवण्यासाठी तुम्ही अगदी सोपा घरगुती उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता. मिठामध्ये असलेला अँटी बॅक्टेरिया गुणामुळे तोंडाचा घाण वास येणारा जो बॅक्टेरिया असतो त्यासाठी मिठातील अँटी बॅक्टेरिया गुणकारी ठरतो. ओरल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे अगदी चांगले असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यास लगेच मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

लिंबूपाण्याचे करा सेवन :- तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी ला दूर करण्यासाठी लिंबू पाणी पिणे हादेखील एक सोपा घरगुती उपाय ठरू शकतो. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन एक लिंबू पिळून टाकावे या पाण्याचे सेवन दररोज सकाळी उठल्यावर करावे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हे पाणी ब्रश करण्या अगोदरच प्या. तोंडातून दुर्गंधी येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बॅक्टेरिया मारण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

भाजलेली लवंग :- तोंडातून येणाऱ्या दुर्गंधी ला दूर करण्यासाठी भागली लवंग देखील उपयुक्त ठरू शकते. हा उपाय करण्यासाठी एक लवंग भाजून घ्यावी आणि दाताने ती चावून घ्यावी. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार भाजलेले लवंग ओरल हेल्थ साठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

वरील हे साधे सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या तोंडातून येणारी दुर्गंधी थांबवू शकता. हे उपाय अगदी सोपे व साधारण आहेत जे तुम्ही घरीच अगदी सहजपणे करू शकता अतिशय कमी साहित्यात.

Post a Comment

Previous Post Next Post