
कोरोना काळात अजब गजब घटना घडताना दिसत आहेत. कोणाला कुणीही अजूनही सिरिअसली घेतलेले नाही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या भारतामध्ये दुपटीने वाढत चालली आहे. अशातच तोंडात बोट घालायला लावणारी एक घटना मुंबईमध्ये घडली आहे
आश्चर्यचकित करून टाकणारी ही घटना मुंबईतील वाशीमध्ये घडली आहे. 24 जुलै च्या रात्री एका 28 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला फोन करून सांगितले मि कोरोना पॉझिटिव्ह आहे, मी आता जगू शकणार नाही. पत्नीला काही समजायच्या आतच फोन बंद झाला. घाबरलेल्या पत्नीने आपल्या भावाला फोन करून ही सर्व हकीकत सांगितली आणि नंतर दोघांनी मिळून पतीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
वाशी मधील सेक्टर नंबर 17 मध्ये त्या व्यक्तीची मोटरसायकल, बॅग, चावी आणि हेल्मेट मिळाले परंतु त्या व्यक्तीचा तेथे काहीच पत्ता नव्हता. वाशी पोलिसांमध्ये याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलिस या गोष्टीचा तपास सुरू करू लागले. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही चेक केले मोबाईल लोकेशन ट्रेस करून पाहिले.
त्या व्यक्तीची ज्या ठिकाणी मोटरसायकल व इतर वस्तू मिळाल्या होत्या तेथे जवळ असलेल्या एका तलावामध्ये सुद्धा बोटीने जाऊन शहानिशा केली परंतु कोणालाही ती व्यक्ती सापडली नाही. पोलिसांना अशातच त्या व्यक्तीच्या प्रेमसंबंधाची बातमी मिळाली आणि मग पोलिसांनी आणखीनच कसून तपास सुरू केला.
महिनाभर त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना शेवटी त्याचा पत्ता सापडला ती व्यक्ती इंदूरमध्ये होती. वाशी पोलिसांची एक टीम जेव्हा इंदूर मध्ये पोहोचली तेव्हा पोलिसांना तो व्यक्ती आपल्या प्रियसी सोबत मिळाला. 15 सप्टेंबरला पोलिसांनी त्याला पकडून मुंबईला आणले.
Post a comment