रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे. लोक त्यांच्यासारखी लाईफ स्टाईल जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत. त्यांची आलिशान जीवनशैली पाहून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असते. अंबानी कुटुंब चित्रपटाच्या जगात काम करत नाही, परंतु लोकांना त्यांच्याविषयी एखाद्या स्टार्सपेक्षा अधिक जाणून घ्यायचे असते. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा काही एका स्टार्स पेक्षा कमी नसतो.

आकाशच्या लग्नात राधिका दिसली होती:-वर्ष 2018 मध्ये मुकेश अंबानीने आपल्या एकुलत्या मुलीचे म्हणजे ईशा अंबानीचे लग्न मोठ्या धूमधडक्यात केले. याखेरीज सन 2019 मध्ये त्याने आपला मोठा मुलगा आकाश अंबानी याचाही अतिशय आलिशान असे लग्न लावून दिले. या दोन्ही विवाहांवर आजपर्यंत सर्वाधिक चर्चा झाली आहे. या लग्नात बऱ्याच मोठ्या स्टार्सनी जेवण सर्व्ह केले. आता फक्त मुकेश अंबानीचा छोटा मुलगा अनंत अंबानी लग्नासाठी बाकी आहे. अशा परिस्थितीत तो कोणाशी लग्न करणार असा प्रश्न सगळ्यांना पडतो. जर आपण असा विचार करीत आहात की अनंत अंबानी सिंगल आहे तर हे अगदी चुकीचे आहे. आम्ही त्याच्या आगामी वधूशी आपला परिचय करून देतो.

बर्यांच लोकांना माहित आहे की अनंत अंबानी सिंगल नाही तर त्याची एक सुंदर गर्लफ्रेंड देखील आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या रोका अर्थात एंगेजमेंट पार्टीमध्ये याचा खुलासा झाला आहे. त्या पार्टीतच सर्वांना ठाऊक होते की राधिका मर्चंट ही अनंत अंबानीची गर्लफ्रेंड आहे. अनंत याने बोलवल्यानंतरच राधिका त्या नामांकित पार्टीमध्ये सामील झाली होती. या पार्टीत बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान देखील होता. पार्टीदरम्यान, त्याने विनोद करून अनंत अंबानीला आपल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगायला सांगितले. तेव्हापासून हे उघड झाले की राधिका मर्चंट अनंतची प्रेयसी आहे आणि ती आपल्या कुटूंबाची भावी छोटी सून होईल.

नीता अंबानी यांना देखील राधिका आवडते:- विशेष म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट कित्येक प्रसंगी एकत्र फिरताना दिसले आहेत. दोघांनाही बर्याईच कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राधिका मर्चंटने अँटीलियातील आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये डान्समध्ये भाग घेतला. या कार्यक्रमात ईशा अंबानी आणि श्लोका मेहता यांनी घुमर नृत्य सादर केले ज्यामध्ये राधिका मर्चंट देखील होती.

राधिका मर्चंट देखील अंबानी कुटुंबाची भावी सून होणार आहे. नीता अंबानी राधिकावर खूप प्रेम करतात. अंबानी कुटुंबात जे काही कार्यक्रम असतो तेव्हा निता अंबानी नक्कीच राधिका मर्चंटला बोलवत असतात. दोघेही सध्या सासू-सुनेचे बंधन असल्यासारखे वागतात. आता सर्वांना ठाऊक आहे की अंबानी कुटूंबाशी नाते असणे म्हणजे ती देखील खूप श्रीमंत असेल.

कोण आहे हे मर्चंट कुटुंब:- राधिकाचे वडील विरेन मर्चंट हे एडीएसचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय ते एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि व्हाइस चेअरमन देखील आहेत. ते मूळचे गुजरातमधील कच्छचे आहेत. विरेन मर्चंट आधीपासूनच अंबानी कुटूंबाशी जोडलेले आहे आणि दोघांची चांगली मैत्री आहे. तसे, अंबानी कुटुंबातील फंक्शनमध्ये ते क्वचितच दिसतात. बरेचसे कार्यक्रमामध्ये फक्त राधिका दिसत असते.

राधिका मर्चंट काय करते:- राधिका मर्चंट तिच्या कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित आहे. तिचे वडील विरेन यांच्याकडे एकूण 8 कंपन्या आहेत. राधिका मर्चंटचे आजोबा गोवर्धनदास मर्चंट यांनी धीरूभाई अंबानी यांच्याप्रमाणेच बर्यालच संघर्षानंतर यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. राधिका तिच्या वडिलांच्या कंपनी एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून काम पाहते. राधिका मर्चंटच्या आईचे नाव शैला मर्चंट आहे. त्यांच्याबद्दल फारसे माहिती नाही, पण मुंबईच्या अनेक पार्ट्यांमध्ये त्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. त्या एन्कोर हेल्थकेअर येथे संचालक देखील आहेत आणि त्यांच्या पतीच्या अनेक कंपन्यांमध्येही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्या पार पाडतात.

राधिका मर्चंटची बहीण अंजली मर्चंट तिच्यापेक्षा मोठी आहे. तिने परदेशातून उच्च शिक्षण घेतले आहे. एनकोर हेल्थकेअरमध्येही तिने उच्च पद भूषविले आहे. पण तिला मीडिया आणि लाइमलाइटमध्ये रहायला आवडत नाही, म्हणून लोकांना तिच्याबद्दल फारसे माहिती नसते. आम्ही सांगतो की आकाश अंबानी लग्न करीत होते तेव्हा अशी अफवा होती की अनंत अंबानी आणि राधिकानेही लग्न केले आहे परंतु या गोष्टी चुकीच्या होत्या. पण राधिकाला संपूर्ण अंबानी कुटुंब पसंत करते आणि राधिकालाही अनंत खूप आवडतो. अशा परिस्थितीत ती लवकरच अंबानी घराची छोटी सून होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post