प्रत्येकाला आपल्या नशिबावर भरवसा असतोच नशीब आपल्याला खूप सारे संकेत देत असते. यापैकी काही संकेत हे नशीब तुम्हाला श्रीमंत होण्याअगोदर देखील देतात. हे दिलेले संकेत जर तुम्हाला कळले तर तुम्ही खूपच जोराने श्रीमंत होऊ शकता. परंतु तुम्हाला हे संकेत कळून नाही आले तर तुम्ही श्रीमंत तर बनतान पण खूपच संथ गतीने म्हणजेच खूपच हळूहळू. जीवनामध्ये येणारे सुख किंवा दुःख देव कोणत्या ना कोणत्या रूपात देतच असतो.

आपल्या जीवनामध्ये दररोज अशा काही घटना घडत असतात ज्या आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांविषयी संकेत देत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही संकेता विषयी सांगणार आहोत. हे संकेत असा इशारा करत असतात की आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी धनलाभ होणार आहे. तर जाणून घेऊयात काय आहेत देवाचे हे संकेत ज्यांना तुम्ही ओळखून स्वतःचा फायदा करून घ्यावा.

घुबड दिसणे: हे तर सर्वांनाच माहिती आहे की घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन असते. तसेच घुबडाला माता लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले गेले आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे घुबड दिसत असेल तर या गोष्टीचा असा संकेत असतो की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे.

झाडू मारणे : जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखाद्या व्यक्तीला झाडू मारताना पाहिल्यास हा देखील खूपच शुभ संकेत असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की हे या गोष्टीचे प्रतीक आहे की तुम्हाला कुठून ना कुठून तरी धनप्राप्ती होणार आहे.

शंखनाद : हिंदू धर्मामध्ये शंख ला खूपच शुभ मानले गेले आहे. पूजा करताना शंख वाजवणे ला एक विशेष स्थान दिले आहे. अशातच एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर शंख नाद ऐकू येतो तर हा त्याच्यासाठी शुभसंकेत असू शकतो. असे सांगितले जाते की हे या गोष्टीचे संकेत आहे की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाली आहे.

राजमुकुट दिसणे : जर एखाद्या व्यक्तिला स्वप्नामध्ये मुकुट दिसतो तर हे खूपच शुभ मानले जाते. हा संकेत या गोष्टीकडे इशारा करतो कि तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा झाली आहे.

कुत्रा काहीतरी खाताना : जर तुम्ही कुठे चालला असाल आणि रस्त्यामध्ये एखादा कुत्रा काहीतरी खात असेल तर हादेखील एक शुभ संकेत मानला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post