सर्वात मोठा कॉमेडी शो म्हणून ओळखला जाणारा आणि सतत चर्चेत राहणारा कपिल शर्मा याचा शो म्हणजेच कपिल शर्मा शो. कपिल शर्मा शो मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये उदित नारायण आले आहे आणि त्यांनी खूपच मस्ती केली आहे. यात उदित नारायण कपिल शर्मा च्या एपिसोड च्या पगाराविषयी बोलताना दिसतात. तेव्हापासून अनेक ठिकाणी कपिल शर्माच्या पगाराविषयी चर्चा सुरू झाली आहे.

तुम्ही हे जाणून हैरान व्हाल की इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये कपिल शर्मा देखील आहे. एका इंटरव्यू मध्ये 'द कपिल शर्मा शो' विषयी आणि कलाकारांच्या व सेलिब्रिटीजच्या मानधनाविषयी चर्चा केली गेली होती. या इंटरव्ह्यूमध्ये असे सांगितले होते की कपिल शर्मा शो बंद झाल्यामुळे कपिल शर्माला लाखोंचे नुकसान झाले आहे. खरे तर अगोदर कपिल शर्मा प्रत्येक एपिसोड 60 ते 70 लाख रुपये एवढी मानधन स्वीकारत होते.

परंतु शो बंद होऊन पुन्हा सुरू झाला तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान हे कपिल शर्मा चे झाले कारण त्यांचे मानधन खूपच कमी करण्यात आले होते. त्यांना पंधरा ते वीस लाख प्रति एपिसोड मिळू लागले होते. 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' हा शो बंद झाल्यानंतर 'द कपिल शर्मा शो' सुरू झाला. या शो दरम्यान कपिल शर्मा चे मानधन जवळपास तीन पट कमी करण्यात आले.

या कार्यक्रमात काम करत असलेले कलाकार म्हणजेच कृष्णा अभिषेक आणि भारती यांनाही काही जास्त मानधन मिळत नाही परंतु दहा लाखापर्यंत प्रत्येक एपिसोड चे यांना मिळतात जे त्यांच्या मानाने चांगले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post