घरामध्ये सफाई करण्यासाठी सर्वात जास्त उपयोगात पडणारी वस्तू म्हणजे झाडू. असे सांगितले जाते की घरामध्ये झाडू मारल्याने फक्त घरच साफ होत नाही तर घरामध्ये असलेले दारिद्र्य देखिल साफ होत असते. घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या झाडू आपण त्याला घोळ, खराटा, झाडंची, केरसुनी असे म्हणत असतो. अगदी कमी लोकांनाही माहिती असेल की केरसुणीला म्हणजेच झाडूला देवी मानले जाते. म्हणूनच दिवाळीला केरसुणीची पूजा देखील केली जाते. कारण घरातील कचऱ्या बरोबरच दारिद्र्य नाहीसे करण्याचे काम केरसुणी करत असते. घरामध्ये केरसुनी वापरण्याअगोदर काही गोष्टींचे लक्ष ठेवले पाहिजे. घरात झाडू केव्हा वापरावा तसेच घरामध्ये कोठे व कसा झाडू ठेवावा याचे देखील लक्ष दिले पाहिजे.

सूर्यास्तानंतर चुकूनही काढू नका झाडून :- वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते कि सूर्यास्तानंतर झाडू मारल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते. त्यामुळे कधीही चुकूनही सूर्यास्तानंतर झाडू मारू नये. परंतु कधीकधी काही गोष्टींमुळे आपल्याला रात्रीदेखील झाडू मारावा लागतो यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर रात्री झाडू मारला तर निघालेला कचरा किंवा केर घराच्या बाहेर रात्रीच फेकू नका.

हा रात्री निघालेला कचरा एका ठिकाणी साठवून दुसऱ्या दिवशी सकाळी टाकून द्यावा. असे मानले जाते की घरातील माती सूर्यास्तानंतर बाहेर फेकल्यास त्यासोबत लक्ष्मी देखील घरातून निघून जाते. घरामध्ये नेहमी दारिद्र्य टिकून राहते.

या दिवशी खरेदी करायला हवा नवीन झाडू :- 1-वास्तुशास्त्रानुसार नवा झाडू हा शनिवारी खरेदी करायला हवा. 2- शनिवारी नव्या झाडू चा उपयोग करणे खूपच शुभ मानले जाते. 3- कृष्ण पक्षामध्ये नवा झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. 4- शुक्ल पक्षांमध्ये खरेदी केलेला झाडू अशुभ मानला जातो 5- जर तुम्हाला नवीन झाडू खरेदी करायचा असेल तर नेहमी कृष्ण पक्षामध्ये खरेदी करावा.

चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका झाडू :- 1-चुकूनही किचन रूम मध्ये झाडू किंवा फरशी पुसण्याचे सामान ठेवू नये त्यामुळे अन्न कमी शक्यता असते. 2- घरामधील अन्न पवित्र ठेवण्यासाठी झाडू आणि फरशी पुसण्याचे इतर सामान किचनमधून बाहेर ठेवावे. 3- झाडू कधीही मोकळ्या जागी ठेवू नये. 4- भिंतीला उभे करून कधीही झाडू ठेवू नये त्यामुळे घरात दारिद्रता येण्याची शक्यता असते. 5- झाडू नेहमी जमिनीवर पसरवून ठेवावा.

Post a Comment

Previous Post Next Post