
आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या विषयावर सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला जगातील अजब गजब आजारांविषयी माहिती सांगणार आहोत. हे आजार खूपच विचित्र आजार असतात. चला तर मग आजच्या या लेखाला सुरुवात करुया या लेखातील माहितीमुळे तुम्ही खूपच आश्चर्यचकित होणार आहात.
चालता-फिरता मृतदेह आजार :- तुम्हाला या आजाराविषयी माहिती नसेल आणि कळली तरी तुम्ही ऐकून चकित व्हाल. हा एक मोठा आजार आहे या आजारांमध्ये पेशंट स्वतःला मृतदेह समजून बसतो त्याच्या डोक्यात एक गोष्ट घर करून असते. की तो एक चालता-फिरता मृतदेह आहे. ह्या आजाराला जोडून झोपेची कमी आणि मदयपान आणि नशा करणे याला जोडून असते. परंतु या आजारावर असे काही ठोस कारण समजू शकले नाही यासोबतच या आजाराची लक्षणे देखील समजून येत नाही, कारण या आजाराचे रुग्ण स्वतःला असे समजतात की आपण एक चालता-फिरता मृतदेह आहोत.
तुम्ही कोणीतरी वेगळेचआहात :- या आजाराचे नाव पण थोडं विचित्र वाटते आणि हा आजार थोडा मेंदूशी निगडीत आहे. हे एखाद्या सिनेमातील सिन सारखे स्मरणशक्ती हरवल्यासारखे वाटते. कुटुंबातील व्यक्तीला न ओळखणे या आजारातील रुग्णाचे लक्षणे आहेत. असे वाटते की त्यांच्या आसपासचे कोणी तरी बदललेले आहे. किंवा कोणीतरी बहुरूपी वेश बदलून फिरत आहे. ही गोष्ट तेव्हा भयंकर वाटते जेव्हा या रुग्णाला असे वाटते की मुलीच्या रूपात मुलगा लपलेला आहे.
आपल्या शरीरालाच खाणे :- हा आजार थोडा विचित्रच वाटत असला तरी हा आजार जगातील बऱ्याच व्यक्तींना आहे. या आजाराचे नाव आहे Lesch-Nyhan-Syndrome या आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण आपल्या स्वतःच्या शरीराचे लचके तोडतात. अशा आजाराचे रुग्ण खूपच विचित्र आणि भीतिदायक असतात.
Post a comment