मित्रांनो कधी आपण विचार केले आहे का.की कोणत्या लोकांन समोर नशीब हार मानते. काही अशी लोक आहेत जी वेगळी आहेत. त्यांच्या आयुष्यात दूर भाग्य , भाग्य हिन, कम नशिबी अश्या शब्दांना जागा नाही. ह्या लोकांन समोर नशीब नेहमी हार मानते. आणि ते नेहमीच जिंकतात. कितीही दुःख आली संकटे आली तरी सुद्धा ही लोक कधीच डिप्रेशन मध्ये जात नाहीत. आणि या सर्वांन वर मात करून पुढे जातात. आजच्या लेखामध्ये आपण त्या व्यक्ती मधील असे ५ गुण बघणार आहोत ज्याच्यामुळे नशीब सुधा अश्या लोकांन समोर हार मानते.

१. ही लोक कधीच आपले अपयश मोजत नाही :- मित्रांनो आपल्या सर्वांना थॉमस एडिसन माहिती आहेत आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की बल्बचा शोधा आदी त्यांना १० हजार वेळा अपयश आले. पण आपण कधी विचार केला आहे का १० हजार कोणी मोजले असेल. एडिसन तर हेच म्हणाले असतील की मी हजरो वेळा प्रयत्न केला. पण ते जर अपयश मोजत बसले असते तर ते बल्बचा शोध लावू शकले नसते. जर त्यांनी अपयश मोजले असते. तर त्यांना डिप्रेशन आले असते.

पण एडिसन ह्यांनी कधीच आपले अपयश मोजले नाही.म्हणूनच ते बल्बचा शोध लावू शकले. मित्रांनो आपल्याला अक्षय कुमार माहीतच असेल त्याची आज प्रत्येक फिल्म करोडोचा व्यवसाय करते.पण एक वेळ अशी आली होती की अक्षय कुमार ने एका पाठोपाठ १४ फॉल्प चित्रपट देले होते. पण तो डिप्रेशन मध्ये गेला नाही. झालेल्या चुकांन मधून शिकून प्रयत्न करता राहिला. आणि म्हणूनच आज अक्षय कुमार मोठा अभिनेता आहे. तुम्हाला पण असे वाटत असेल की नशिबाने आपल्या पुढे हार मानली पाहिजे. तर तुमचे अपयश मोजयचे बंद करा.

२. ही लोक आपले यश सुद्धा मोजत नाही :- मित्रांनो आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लोक अपयश मोजत नाहीत पण तुम्ही हे ऐकुन चकित व्हाल. की ही लोक आपल्याला किती यश मिळाले हे सुद्धा मोजत नाहीत. आपल्या सर्वांना सचिन तेंडुलकर माहिती आहे. त्यांना क्रिकेटचा देव सुद्धा म्हणाले जाते. सचिन ने आत्ता पर्यंत ६३ वेळा मन ऑफ द मॅच, १५ वेळा मन ऑफ द सीरिज. इतके किताब जिंकले आहेत. आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १६४ अर्ध शतके आणि १०० शतके ठोकली आहेत. आता जर सचिन सुरुवातीपासून यश मोजत बसला असता. तर तो एवढ्या उंचीवर पोहचला असता का. ५-१० मन ऑफ द मॅच नंतर त्याच्या डोक्यात हवा गेली असती आणि कधीच तो विनोद कांबळी सारखा टीम बाहेर गेला असता. पण तो त्यावर मेहनत करत राहिला. आणि तो कधीच त्याला किती यश मिळाले हे मोजत बसला नाही.तुम्हाला पण असे वाटत असेल नशिबाने आपल्या समोर गुडघे टेकले पाहिजे तर तुम्ही यश मोजत बसू नका. सतत प्रयत्न करत करा.

३:. ही लोक कधीच कोणाबरोबर स्पर्धा करत नाही :- मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की महाभारता मध्ये युधिष्ठिर, अर्जुन, भीम नकल, सहदेव हे गुरु द्रोणाचार्य चे शिष होते पण तेव्हा एकलव्य नावाचा युवक होता त्याला द्रोणाचार्य च्या गुरुकुल मध्ये प्रवेश नाकारला होता कारण तो खालच्या जातीचा होता पण एकलव्य ने प्रयत्न सोडले नाहीत तो सराव करत राहिला आणि एवढा सराव त्याने केला की तो धनुर्विद्या मध्ये सर्वकृष्ढ झाला. त्याने कधीच अर्जुन बरोबर स्पर्धा केली नाही म्हणून मित्रांनो जो कोणाबरोबर स्पर्धा करत नाही जो फक्त स्वतः चा स्थर उंचावण्यावर मेहनत घेत असतो. त्याच्या समोर नशीब नेहमी हार मानते.

४. ही लोक कधीच distract होत नाही, विचलित होत नाही :- मित्रांनो इथे तुम्हाला distraction म्हणजे व्हॉटसअप, फेसबुक, कीव्हा टीव्ही अश्या छोट्या गोष्टी बद्दल बोलायचे नाही. इथे distraction म्हणजे आयुष्मधील खूप मोठ्या घटना जसे की आजारपण दुर्घटना अश्या घटना जरी घडल्या तरी सुद्धा ही लोक विचलित होत नाहीत. आणि आपल्या ध्येय प्राप्ती साठी प्रयत्न करतात. एक अठरा वर्षांचा युवक रणजी कसोटी. क्रिकेट सामना खेळत असतो. संध्याकाळ पर्यंत त्याच्या संघाची वाईट अवस्था असते. आणि दुसऱ्या दिवशी त्या युवकाची संघाला गरज असते.कारण तो बॅटिंग करत असतो. पण अचानक रात्री त्याला त्याच्या वडिलांची मृत्यू ची बातमी कळते. आत्ता काय करायचे एवढ्या लहान वयात सुद्धा तो युवक धैर्य दाखवतो. दुसऱ्या दिवशी जावून बॅटिंग करतो. आणि आपल्या संघाला संकटातून बाहेर काढतो. आणि नंतर आपल्या वडिलांच्या अत्यसंस्कारासाठी जातो. मित्रांनो माहिती आहे तो युवक कोण आहे ते विराट कोहली मित्रांनो अशी अनेक उदाहरण देता येतील. त्यांच्या आयुष्यात खूप मोठे संकटे आली आणि तरी सुद्धा ते अविचलीत राहिले. आणि मग नशिबाने त्यांच्या समोर हार मानली.

५. ही लोक स्वतः मध्ये बदल करायला घाबरत नाही :- मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का मायक्रोसॉफ्ट कंपनी दर दोन वर्षाला निविन विंडोज व्हर्जन का घेवून येत किवा अँड्रॉइड प्रत्येक वर्षी आपली सिस्टम का उपडेट करतो. कारण ह्या सर्वांना माहिती आहे की आपण काळा बरोबर बदललो नाही. तर आपण नामशेष होवून जावू. म्हणून नशीब अश्या लोकांन समोर हार मानते जे बदल करायला घाबरत नाही. त्यांना ध्येपूर्तीसाठी काही वेगळ्या गोष्टी शिकायला लागल्या तरी ते शिकतात. त्यांना त्यांचे शहर सोडून जावे लागले तरी ते जातात. ही लोक कोणतीही परिस्थितीमध्ये स्वतः ला सामावून घेतात. म्हणूनच की काय अशा लोकांन समोर सुद्धा नशीब गुडघे टेकतात. नाहीतर काही लोक स्वतः मध्ये बदल करायला तयार नसतात. नवीन गोष्टी शिकायला तयार नसतात. जर तुम्हाला वाटत असेल नशिबाने तुमच्या समोर हार मानवी. तर स्वतः मध्ये बदल करायला शिका. मित्रांनो हे ५ गुण असलेल्या व्यक्तीला कोणत्याही ज्योतिषाची गरज लागत नाही. म्हणून तुम्ही सुधा हे ५ गुण तुमच्यामध्ये रुजवा म्हणजे तुम्ही आयुष्यात अजिंक्य व्हाल.

Post a Comment

Previous Post Next Post