घरी किंवा घराच्या बाजूला झाडे लावणे अगदी साधारण गोष्ट होऊन गेली आहे. बरेचसे लोक झाडे घराची सुंदरता वाढवण्यासाठी लावतात. परंतु हे घराची सुंदरता वाढवण्यासाठी देखील मदतगार ठरू शकतात. घराची सुंदरता वाढण्या सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढली जाते. झाडे औषधीय गुणांनी भरलेले असतात त्यामुळे त्याचा सुगंधही चहूबाजूने दरवळत असतो. त्यासोबतच धार्मिक मान्यतेनुसार काही झाडांच्या रोपट्या मुळे किंवा झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो असे सांगण्यात येते.

आजच्या या लेखांमधून आपण अशाच काही झाडांविषयी माहिती पाहणार आहोत. अशी झाडे किंवा रोपटे त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येत असते. यासोबतच शारीरिक आणि मानसिक आजार देखील यामुळे दूर होतात.

बांबू चे रोपटे :- घराच्या बाजूला किंवा घरामध्ये बांबूचे रोपटे लावल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते त्यासोबतच घराचे वातावरण अगदी शांत व निर्मळ बनते. पैशासंबंधी च्या सर्व अडचणी यामुळे दूर होतात. यासोबतच जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मनुष्य यशस्वी बनत जातो.

तुळस :- तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. भगवान विष्णूचे हे अगदी आवडते रोपटे आहे त्यामुळे याला अति पवित्र मानले जाते. आजही अनेक लोक त्याची मनोभावाने पूजा करतात. असे मानले जाते की तुळशीचे रोपटे घराच्या अंगणात लावल्यास घराचे वातावरण अगदी सुंदर, स्वच्छ, निर्मळ व आनंदी राहते. घरातील सदस्यांबरोबर एकोपा निर्माण होऊन आणि घरामध्ये एक खेळीमेळीचे वातावरण तयार होत असते. पैशा संबंधीच्या अनेक अडचणी देखील यामुळे दूर होतात. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात याचा काढा करून पिल्यास सर्दी-पडसे लवकरात लवकर दूर होतात.

मोगरा :- हिंदू धर्मामध्ये मोगर्‍याला शुभ फुल म्हणून मानले जाते. मोगऱ्याच्या फुलांमुळे घरांमध्ये अतिशय सुंदर सुगंध दरवळत असतो. या सुगंधामुळे घरांमध्ये सकारात्मक उर्जेचे वातावरण निर्माण होत असते. यामुळे घरातील सदस्यांबरोबर चांगला संवाद निर्माण देखील होत असतो. अनेक गुणांची खाण असलेल्या मोगरा या फुला द्वारे एरोमा थेरपी केली जाते. यासोबतच चेहरा व त्वचेवर होणाऱ्या जागेवर अगदी असरदार उपाय म्हणून या फुलाचा वापर केला जातो.

मनीप्लांट :- वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट ला घरांमध्ये लावल्यास अतिशय शुभ मानले जाते. यामुळे घरांमध्ये निर्माण झालेल्या अनेक पैशांच्या अडचणी दूर होतात. घरातील वातावरण अगदी शुद्ध राहते. याला धनाची देवी लक्ष्मी चे रूप मानले जाते. याला घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावल्यास वास्तूदोष दूर होतो.

Post a Comment

Previous Post Next Post