बदलत्या वातावरणामुळे गळ्यामध्ये थ्रोट म्हणजे घशामध्ये खवखव जाणवत असते. घशात बऱ्याच प्रकारचे इन्फेक्शन होत असते त्यामुळे घसा दुखत असतो. घशाच्या दुखण्याला बरेच लोक साधारण दुखणे समजून बसतात. परंतु घशात इन्फेक्शन होणे याला साधारण समजू नये, घशात सूज येणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, आवाज बसणे हे सर्व कोरोनाचे लक्षण देखील असू शकतात.

घशात खवखव असल्यामुळे गळा सुजणे किंवा घशामध्ये खाज येणे असे प्रकार होत असतात. असे काही घडल्यास ना आपल्याला काही खाता येते ना काही पिता येते. जेवण गिळताना देखील खूपच त्रास होत असतो. गळ्यातील खवखवे पासून लवकरात लवकर सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता ज्याद्वारे तुमचा घसा अगदी पहिल्यासारखा होऊन जाईल.

1. गरम पाणी आणि हळद:- हळदीमध्ये ऑंटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे गरम पाण्यात हळद टाकून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळण्यास नक्कीच फायदा होतो. हा उपाय खूपच सोपा असून यामुळे घसा दुखीवर आराम मिळू शकतो.

2. गरम पाणी आणि लवंगाचे पावडर:- लवंगा मध्ये देखील बॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे गरम पाण्यामध्ये लवंग पावडर मिसळून दररोज दोन ते तीन वेळा गुळण्या केल्यास देखील घशाला आराम मिळून घसा बसला असल्यास आराम मिळतो तसेच सूज कमी होण्यास मदत होते.

3. गरम पाणी आणि अद्रक:- घशातील खवखवीचा त्रास मिटवण्यासाठी तुम्ही गरम पाण्यात अद्रक टाकून त्याच्या गुळण्या करू शकता. त्याने देखील घशावर चांगला परिणाम होऊन घसा पहिल्यासारखा होतो.

4. गरम पाणी आणि मीठ:- मिठामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे लोक नेहमी गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करत असतात. त्यामुळे घशाला आराम मिळत असतो. डॉक्टरांकडून देखील याबाबत सांगितले जाते. हा उपाय खूपच सोपा आणि अगदी सहजपणे केला जाऊ शकतो. त्यामुळे घशाची सूज. होण्यास मदत होत असते.

Post a Comment

Previous Post Next Post