सर्व महिलांना असे वाटत असते की आपले केस हे काळे आणि लांब सडक असावे. यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. काही तर खूप पैसा देखिल घालतात कशासाठी तर फक्त केस लांब आणि काळे करण्यासाठी. यासाठी पैसा घालण्याची काहीच आवश्यकता नाही आहे कारण आपण अगदी घरबसल्या अगदी सोपे उपाय करून केस काळे आणि आणि लांब करू शकतो.

फारच थोड्या लोकांना हे माहित आहे की हरभरा पीठ वापरुन आपण आपले केस लांब आणि काळे बनवू शकतो. हो केसांच्या समस्येचे निराकरण हरभऱ्याच्या पिठाद्वारे नक्की मिळू शकते. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला केसांसाठी हरभरा पीठ फायदेशीर कसे बनवायचे आणि ते कसे वापरावे हे सांगणार आहोत.

भारतीय स्वयंपाक घरामध्ये बेसनपीठ अगदी सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू आहे. अनेक भाज्या करण्यासाठी भजे देण्यासाठी आणि इतर अनेक पदार्थ बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. परंतु हे फार कमी लोकांना माहिती आहे की हरभर्‍याच्या पिठाचा वापर करून आपण आपल्या केसांना लांब आणि काळे बनवू शकतो. बेसन पिठामुळे केसा संबंधीच्या सर्व समस्याचे समाधान होऊ शकते.

आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की बेसन पीठ आपल्या केसांसाठी कसे फायदेशीर ठरू शकते. यासोबतच आपल्या केसांना बेसन पीठ कसे लावावे यासंबंधीचा सूचना देखील या लेखातून तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया बेसन पीठ केसांना लावण्याचे फायदे आणि ते कसे लावावे.

केस गळती होत असेल तर असे लावा बेसन पीठ :- बादाम पावडर - 1, चमचा ऑलिव्ह ऑइल - 1 चमचा, विटामिन-ई कैप्सूल - 2, बेसन पीठ - 1 कप.. कसे लावावे? 1- वर दिलेले सर्व साहित्य एका वाटीमध्ये घेऊन मिक्स करावे आणि त्याची पेस्ट बनवावी. 2- ही पेस्ट केसांना लावून केस वाळेपर्यंत ही पेस्ट केसांवर राहू द्यावी. 3- काही काळानंतर केस गार पाण्याने धुऊन काढावे. 4- हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करावा यामुळे तुमच्या केसांना पोषकतत्वे पोहोचतात.

निर्जीव केसांसाठी :- बेसन पीठ - 2 चमचे, मध - 2 चमचे, खोबरेल तेल - 2 चमचे, पाणी - आवश्यकता नुसार.. कसे लावावे? 1- वर दिलेले सर्व साहित्य एका वाटीमध्ये घेऊन मिक्स करावे आणि त्याची पेस्ट बनवावी. 2- या पेसचा शॅम्पू प्रमाणे वापर करावा. 3- हे सर्व केसांना लावल्यानंतर हळूहळू याची मालीश करावी काही काळ हे तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाकावे.

डेंड्रफ, कोंडा असलेल्या केसांसाठी :- बेसन पीठ - 6 चमचे, पाणी - आवश्यकते नुसार.. कसे लावावे? 1- यासाठी बेसन पिठामध्ये पाणी ओतून याची एक पेस्ट तयार करावी. 2- या फेसला केसांना दहा मिनिटांसाठी लावावे. 3- दहा मिनिटानंतर केसांना थंड पाण्याने धुवावे. 4- बेसन पिठा मध्ये खूप काही असे तत्व असतात ज्यामुळे केसांमध्ये असलेला कोंडा किंवा डेंड्रफ लगेच नाहीसा होऊ शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post