वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूचे एक ठरलेली जागा असते ती वस्तू त्या ठिकाणी ठेवावी लागते नाहीतर त्यामुळे तुम्हाला अनेक त्रास सोसावा लागू शकतात. आपण घरामध्ये देवासाठी देवघर बनवत असतो पण देवघर बनवत असताना आपल्याकडून अनेक चुका होतात त्यामुळे आपल्याला पश्चाताप करत बसावे लागू शकते. घरामध्ये देवघर बनवत असताना देवघराच्या तोंड कुठल्या दिशेला आहे हे सर्वप्रथम बघितले पाहिजे त्यासोबतच जेव्हा आपण देवघरासमोर पूजेला बसू तेव्हा आपले तोंड कोणत्या दिशेला असेल याची देखील काळजी घेतली पाहिजे.

जेव्हा आपण देवघरासमोर बसून पूजा करत असतो किंवा एखाद्या फोटो समोर बसून पूजा करत असू तेव्हा आपले तोंड हे नेहमी पूर्व दिशेला असायला हवे. काही कारणास्तव जर तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून पूजा करू शकत नसाल तर पश्चिम दिशेला तोंड करून देखील पूजा करू शकतात. यासाठी पश्चिम दिशा देखील शुभ मानली जाते.

आपण असे पाहतो की बऱ्याचशा घरांमध्ये देवघर हे जमिनीवर बनवले जाते. परंतु वास्तुशास्त्रानुसार देवघर हे असे असायला हवे की देवाचे पाय आणि आपला हृदय हे दोन्ही समांतर असायला पाहिजे. कारण देव सर्वोच्च आहे आणि देवघरामध्ये देवाला खालच्या जागी ठेवू नये.

देवघरामध्ये जेव्हा पूजा किंवा आरती केली जाते त्यानंतर पूजेसाठी वापरलेला दिवा तेथेच ठेवला जातो. परंतु वास्तुशास्त्र नुसार दिवा हा नेहमी मंदिराच्या दक्षिणेकडे ठेवायला हवा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहते.

देवाचे देवघर हे नेहमी लाकडाचे असायला हवे काही लोक संगमरवराचे देखील देवघर बनवतात ते देखील चांगलेच आहे. संगमरवराचे देवघर देखील चांगले मानले जाते कारण त्याने घरामध्ये सुख शांती येत राहते.

जर तुमच्या घरामध्ये खूपच कमी जागा असेल तर देवघरासाठी एक वेगळी जागा तयार करावी. जागा निवडताना वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या दिशेचे लक्षात ठेवा. जर तुमचे घर मोठी असेल तर देवघर हे एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.

वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या, हिरव्या आणि फिकट गुलाबी रंगाची भिंत देवघरासाठी उत्तम आणि शुभ मानली जाते. रंग देताना याची काळजी घ्या की देवघराच्या सर्व भिंतींचा रंग एकच असायला हवा.

काही लोक घरातील मृत व्यक्तींची फोटो देखील देवघरात देवाच्या आजूबाजूला ठेवतात आणि देवाच्या पूजेचे सोबत त्यांची देखील पूजा करण्यास सुरुवात करतात. जर तुम्हाला फोटो ठेवायचा असेल तर देवघराच्या कडेला नाहीतर देवाचा खालच्या बाजूला ठेवावे.

Post a Comment

Previous Post Next Post