बॉलीवूड चे दबंग अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सलमान खान यांच्या पुन्हा एकदा अडचणी वाढणार आहेत. कांकानी हरिना संबंधीचा हा सर्व मामला आहे. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील न्यायालयाने सलमान यांना 28 सप्टेंबर रोजी हजेर लावण्यास सांगितले आहे. यासंबंधीचा जिल्हा जज कडून आदेश देखील जारी केला गेला आहे.

आदेश जारी करण्या अगोदर जज ने या केसची सुनवाई जारी केली आहे. कोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान सलमान यांचे वकील हस्तीमल सारस्वत देखील उपस्थित होते.

सलमान खान 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कांकानी गावात काळ्‍या हरणाची शिकार केल्याचा आरोप आहे. या चित्रपटांमध्ये काम करत असलेली दुसरे अभिनेते देखील सलमान बरोबर होते. बॉलीवूडचे हे कलाकार म्हणजे सेफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्ब, नीलम आणि दुष्यत सिंग हे कलाकार सलमानसोबत शिकार करते वेळी उपस्थित होते. ही केस तेव्हापासून आतापर्यंत सुरू आहे.

बाकीच्या कलाकारांना मिळाली होती सुटका:- या केस मध्ये सलमान सोबत असलेले बॉलिवूड मधील कलाकार म्हणजे सेफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्ब, नीलम आणि दुष्यत सिंग यांना कोर्टाकडून सुटका मिळाली होती. परंतु यातून सलमानला काही सुटका मिळाली नाही सलमानला या केस संबंधीच्या प्रत्येक सुनवाईला हजेरी लावावी लागते. सुनावणीदरम्यान सलमानला कोर्टात उपस्थित देखील रहावे लागते.

सध्या सलमान खान आपला चित्रपट 'राधे:- योर मोस्ट वांटेड' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत असून या चित्रपटात सलमान बरोबर दिशा पाटणी आणि रणदीप हुड्डा हे बॉलिवूडचे कलाकार दिसणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post