
कोरोणा चे संकट जेव्हापासून आपल्यावर आले आहे तेव्हापासून आपण बऱ्याच या दिग्गजांना गमावून बसलो आहोत. काल असाच एका दिग्गजाचा कोरोना मुळे मृ*त्यू झाला. ह्या मराठी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये नाव कमावलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांचे नाव आशालता वाबगाकर असे आहे.
आशालता वाबगावकर यांचा जुन्या आजारानंतर सातारा मधील एका रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. रुग्णालयातील प्रशासनाने त्यांच्या मृ*त्यूची पुष्टी केली आहे. अशालाता यांचे वय 79 वर्ष होते आणि 17 सप्टेंबर पासून त्यांचे एका रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे मराठी सोबतच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम केले आहे अमिताभच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपली भूमिका वठवली होती.
त्यांनी मराठी चित्रपट माहेरची साडी मध्ये विकी च्या आईची म्हणजेच लक्ष्मीच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला होता या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच गाजली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी असे सांगितले की सोमवारी रात्री पासूनच त्यांची तब्येत बिघडली होती. ज्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु त्यांनी आज सकाळी आपला शेवटचा श्वास घेतला.
आशालता ह्या साताऱ्यामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या कामासाठी गेल्या होत्या, आशालता या मूळच्या गोव्यातल्या असून त्यांनी बऱ्याच या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची काही प्रमुख चित्रपट असे होते, पराये, उंबरठा, माहेरची साडी, अंकुश, शैतानी इलाका, खून का कर्ज, घायल, बंद दरवाजा, चलते चलते, जंजीर, उधार का सिंदूर, शौकीन, नमक हलाल, कुली हे त्यांनी केलेले काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.
Post a comment