खूपच क्युट आणि सुंदर दिसणारी सारा अली खान कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमुळे चर्चेत येत राहते. सारा अली खान ही सैफ अली खान यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. सैफ अली खान यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंग असे आहे.

त्यांनी दुसरा विवाह केला असून दुसऱ्या पत्नीचे नाव करीना कपूर असे आहे. करीना आणि सैफ अली खान यांना एक मुलगा देखील असून त्याचे नाव तैमुर अली खान असे आहे.

आत्ताच झालेल्या एका इंटरव्यू मध्ये साराने असे सांगितले की मी जेव्हा लहान होते तेव्हा एका रस्त्याने चालले होते तेव्हा लोकांनी मला भिकारी समजले होते. साराने इंटरव्यू मध्ये असे सांगितले की जेव्हा मी छोटी होते तेव्हा लोकांनी मला चुकून भिकारी समजले होते.

साराने सांगितले की हा किस्सा आमच्या फॅमिली व्हेकेशन च्या काळातील आहे. सारा आपले वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग बरोबर बाहेर फिरायला गेली होती.

त्यावेळी सेफ अली खान आणि अमृता सिंग एका शॉप मध्ये गेले होते तर सारा-इब्राहिम हे शॉप च्या बाहेर आपल्या नोकरांवर बरोबर उभे होते. साराने सांगितले की मी तेथेच रस्त्यावर डान्स करायला लागले होते आणि तेथे जमलेल्या लोकांनी मला पैसे देखील दिले होते.

कारण लोकांना असे वाटत होते की सारा ही भीक मागत आहे. सारा पुढे असे सांगते की मी हे पैसे तसेच जपून ठेवलेले आहेत. परंतु जेव्हा अमृता आणि हे शॉप च्या बाहेर आले तर तेथील नोकरांनी त्यांना असे सांगितले की बघा साराच्या क्युटनेस मुळे लोकांनी तिला पैसे दिले त्यावर साराच्या आईने असे म्हटले की साराला त्यांनी चुकून भिकारी समजले असावे.

Post a Comment

Previous Post Next Post