चहा म्हटले की चहा प्रेमिंची यावर एक वेगळीच स्माईल असते. भारतासारख्या देशात अर्ध्यापेक्षा जास्त घरांमध्ये सकाळी चहा केला जातो कारण बहुतेक लोकांना आपला दिवस चहाने सुरू करण्याची सवय असते. कारण काही लोकांना गरम चहा येईपर्यंत त्यांची सकाळ होत नसते. बरं चहा प्यायल्याने काही होत नाही, पण हो इथे समस्या ही आहे की तुम्ही चहा बनवल्यानंतर उरलेल्या चहाची पत्ती फेकून दिलीत का.

जर तुमचे उत्तर हो असे असेल तर तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की हे केल्याने तुमचे स्वतःचे नुकसान होईल कारण जी चहाची पत्ती आपण निरुपयोगी म्हणून टाकतो ती आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते.ती कशी? तर मग कसे ते जाणून घेऊया आजच्या या लेखातून.

वर्षाचे १२ महिने आपल्याला घराबाहेर जावे लागते, काही जण घराबाहेर जातात तर काही ऑफिसमध्येकाम करतात पण प्रत्येकाला कडक उन्हात सामोरे जावे लागते, यामुळे लोकांमध्ये सनबर्नची समस्या उद्भवते आणि ते टाळण्यासाठी बरेच महाग सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम देखील अयशस्वी ठरतात परंतु सर्व अपयशी ठरल्या नंतर यावर मात करण्यासाठी तुम्ही टी-बॅग वापरुन शकता.

काही टी-बॅग्स थंड पाण्यात भिजवा आणि नंतर हलक्या हातांनी दाबून घ्या आणि त्या चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी झोपून घ्या. यामुळे आपली सनबर्न ची समस्या लवकर दूर होईल.

जर आपण एखाद्या किडा चावल्यास ज्यामुळे आपल्याला खाज होते आणि त्यामुळे चिडचिड, वेदना होतच असते. हे आपण दूर करण्यासाठी चहाची पिशवी वापरू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post