बॉलिवूडची बेबो करीना कपूर कुणाला माहीत नसणार चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला करीना कपूर बद्दल माहिती असणार. सैफ अली खानची दुसरी पत्नी असलेली करीना कपूर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दिसत असते. दिसायला खूपच सुंदर असलेल्या करीना कपूरने आपल्या चाहत्यांना वेडच लावले आहे.

करीना चा आज वाढदिवस आहे. करीना आज 40 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिने काल यासंदर्भात एक पोस्ट जाहीर केली होती ज्यामध्ये तिने सांगितले होते की मी 40 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर या संदर्भात काय म्हणाली आहे करीना बघूया आजच्या या लेखातून.

करीनाने काल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपला एक फोटो शेअर केला ज्यामध्ये करीनाने एक गोड स्माईल दिली आहे. आणि खाली करीनाने असे लिहिले आहे की, " जसे की मी 40 व्या वर्षात पदार्पण करत आहे, मी सीट बैक, रिफ्लेक्ट, लव, लॉफ, फॉरगिव, आणि फॉरगेट करू इच्छिते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला ताकद देण्यासाठी प्रार्थना करा.

पुढे करीनाने असे लिहिले आहे की, "मला अशी महिला बनवल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते" त्यात पुढे असे लिहले आहे की काही बरोबर, काही चुकीचे, काही चांगले, काही वाईट तरीपण तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.

करीना दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसी विषयी जाहीर केले होते. करीना आणि सैफ अली खान यांना अगोदरपासूनच तैमुर अली खान नावाचा एक मुलगा देखील आहे जो सोशल मीडियाचा राजा बनला आहे त्याचे सोशल मीडियावर बरेचसे चाहते आहेत.

करीना आणि अमीर खान यांचा 'राम सिंह चड्डा' हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट 1994 मध्ये आलेला हॉलीवूडचा चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' यावर आधारित आहे त्यासोबतच करीना करण जोहरच्या 'तख्त' या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post