महिलांना अशा समस्या जास्त उद्भवत असतात की किती पण महागडे कपडे घेतले तरी एक किंवा दोन धुण्यातच ते खराब होतात. याचे कारण असे आहे की महिला कपडे धुते वेळेस स्वस्त व महाग कपडे एकत्र करून धुतात. महागड्या कपड्यांना साध्या कपड्या सारखे घासून धुतात ज्यामुळे महागाचे कपडे लवकरच खराब होतात त्यामुळे महागाचे कपडे धुते वेळेस व्यवस्थित हाताळले पाहिजे.

1) वेगळे ठेवा कपडे:- महागडे कपडे धुताना ते डिटर्जंट पावडर मध्ये आपल्या रोजच्या कपड्या बरोबर न भिजवता ते वेगळे भिजवावे. इतकेच नाही तर त्यांना जास्त वेळ पर्यंत भिजवू नये नाहीतर ते चुरमटून जातात त्यांना जास्त घड्या गुंजा पडतात त्यामुळे कपडे वेगळे ठेवावे.

2) लेबल जरूर वाचावे :-प्रत्येक महागाच्या कपड्यांवर लेबल लावलेले असते. त्यावर कपडे व्यवस्थित ठेवण्याबाबत व कपडे स्वच्छतेचे नियम लिहिलेले असतात. काही वेळेस लेबलवर खुणा केलेल्या असतात त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या व कपड्यांना चांगले धुवा.

3) कपडे धुण्याची माहिती :- महागडे व नाजूक कपडे मशीन मध्ये न टाकता हाताने धुवावेत. कपड्यांना थोड्या कोमट पाण्याने धुवावे. लक्षात ठेवा की डिटर्जंट पावडर चांगले निघून गेले पाहिजे नाहीतर कपडा खराब होऊन पांढरा पडू शकतो. त्यावर चुकूनही ब्रशने घासू नका नाहीतर धागे निघून जातात.

4) डागांना द्या प्री ट्रीटमेंट :- कपड्यावर जेवणाचे किंवा इतर कशाचे तरी डाग पडले असतील तर धुण्याचा अगोदर त्यांना प्री ट्रीटमेंट द्या. उदाहरणार्थ, कपड्यावर पाणी टाकून हलक्या हलक्या बोटांनी त्या ठिकाणी स्वच्छ करा आणि त्यावर थोडेसे डिटर्जंट पावडर लावून हलक्या हाताने चोळले तरी ते डाग निघून जाईल.

5) धुण्याच्या च्या अगोदर :- कपड्यांचा घामाचा वास वा इतर प्रकारचा वास निघून जाण्यासाठी कपड्यांना 15 मिनिटे पाण्यात बुडवावे. त्यामध्ये कलर सोफ्टर व फॅब्रिक सोफ्टर पण टाकू शकता. त्यानंतर कपडे स्वच्छ पाण्याने धुवावे कपड्यांचा वास निघून जाऊन त्यातून सुगंधीत वास येईल.

6) असे वाळवा कपडे :- कपड्यांना कधी जोरात पिळायचे नाही नाहीतर त्याचे धागे तुटताना इतकेच नाही तर कपडे निझुर होतात. कपडे कधी जास्त कडक उन्हात वाळत घालायचे नाही कारण की उन्हाने कपड्यांचा रंग जातो. कपडे फिके होतात व जूनकट वाटतात तसेच खराबही होतात.

Post a Comment

Previous Post Next Post