
अक्षय कुमार सध्या एका शोमध्ये येण्या वरून खूपच चर्चेत आहे. या शोचे नाव आहे 'इन टू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स'. बऱ्याच जणांना या शो बद्दल माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा शो डिस्कवरी या वाहिनीवर प्रदर्शित होत असतो. या शोमध्ये एकच कलाकार असतो ज्याचे नाव बेयर ग्रिल्स असे आहे.
बेयर जंगलांमध्ये फिरून तुम्ही कशा प्रकारे राहू शकता याबद्दल माहिती दाखवत असतो. जो बहुतेक वेळा जंगलामध्ये जगण्यासाठी किडे किंवा अजब गोष्टी खाताना आढळतो या गोष्टी भारतामध्ये विचित्र वाटत असल्या तरी या शोचे फॅन फॉलोविंग भारतातून कमी नाही.
काही दिवसापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा या कार्यक्रमात दिसले होते. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत ही या कार्यक्रमात दिसला होता. आता बॉलिवूडमधील खिलाडीकुमार अक्षय देखील या शो मध्ये दिसणार आहे.
या शोमध्ये अक्षयने काही किस्से उघड केले तर आपल्या रोजच्या डेली रुटीन बद्दलही काही गोष्टी सांगितल्या. आजच्या या लेखातून आपण हे पाहणार आहोत की अक्षय ने नेमकी काय सांगितले आहे.
या कार्यक्रमादरम्यान अक्षय ने हा खुलासा केला की तो दररोज गोमूत्राचे सेवन करतो. असे तो का करतो हे तर सर्वांना माहितच असेल कारण गोमूत्रा मध्ये अनेक आयुर्वेदिक गुण सामावलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये अक्षयला हत्तीच्या शेणापासून बनवलेली चहा घ्यावी लागली होती.
या विषयी बोलताना हुमा कुरेशी ने असे विचारले की असे करताना तुला काही चिंता तर वाटली नाही ना, तर यावर अक्षयने असे उत्तर दिले की, "नाही मी तर उत्सुक होतो, कारण मी दररोज गोमुत्राचे सेवन करतो" या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले असून हा कार्यक्रम 11 सप्टेंबर रोजी डिस्कवरी प्लस या वाहिनीवर प्रदर्शन देखील झाला आहे.
Post a comment