पृथ्वीवरील सर्वात वेगवान आणि शक्तीशाली राजा म्हणजे "रावण"....या नावाचा जगामध्ये दुसरा कोणीही व्यक्ती नाहीये. राम तर खूप मिळून जातील पण रावण कधीच मिळणार नाही. राजाधिराज लंकापति रावणाला दशानन सुद्धा म्हटले जाते. असे सांगितले जाते की संपूर्ण लंकेचा एकमेव राजा हा रावण होता. रावण एक कुशल राजनीती तज्ञ आणि सेनापती होता. रावण खूपच तत्वज्ञानी होता त्याला बऱ्याचशा विद्या माहीत होत्या.

रावणाला मायावी का म्हटले जाते तर रावण हा इंद्रजाल, यंत्र संमोहन या सर्व प्रकारच्या विद्या जाणत होता. रावणाकडे असे विमान होते जे अन्य कुणाकडेही नव्हते. या सर्व कारणांमुळे सर्वजण रावणाला खूपच घाबरत असे. रावण हा खूपच दृष्ट असला तरी तो महादेवाचा सर्वात मोठा भक्त होता.

रावणाचा विवाह हा मंदोदरी सोबत झाला होता. मंदोदरी एक पतिव्रता स्त्री होती जी निरंतर महादेवाची आराधना करत असे. आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की मंदोदरी कुणाची मुलगी होती. तसेच मंदोदरी चा आणि रावणा चा विवाह कसा झाला.

पौराणिक कथांच्या नुसार असे सांगितले जाते की मंदोदरीचा जन्म हा हेमा नावाचा अप्सरेचा गर्भातून झाला होता. हेमा नावाच्या या अप्सरेचा विवाह मायासूर सोबत झाला होता माया सुराने हेमा अप्सरे साठी मंडोर नगर निर्माण केले होते. हे मंडळ नगर अजूनही राजस्थान मध्ये आहे. मंदोदरी ही मध्यप्रदेश मधील मंदसोरी राजाची मुलगी होती.

मंदोदरी लहानपणापासून भगवान शंकराची आराधना करत असेल तिने साधनेद्वारे व आपल्या पूजा आणि तपाद्वारे भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. भगवान शंकर जेव्हा मंदोदरी वर प्रसन्न झाले तेव्हा भगवान शंकरांनी मंदोदरीला एक वरदान मागण्याचे संगितले मंदोदरी असे वरदान मागितले होते की आपला विवाह पृथ्वीवरील सर्वात ताकदवर आणि विद्वान पुरुषाशी व्हावा. या वरदानामुळे रावण आणि मंदोदरी यांची भेट बिलवेश्वर नाथ मंदिरात झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post