आपण कुठेही गेलो तर आपल्याला प्रत्येकाच्या घरात देवाचे मंदिर किंवा देवघर पाहायलाच मिळतच असते. हिंदू धर्मानुसार लोक प्रत्येक दिवशी आपल्या देवघरातील देवाची नित्यनियमाने पूजा करत असतात. तसेच दररोज दिवा लावत असतात तर काही लोक नित्यनेमाने देवाची आरती सुद्धा करत असतात. देवापुढे अगरबत्ती फुले वाहून दररोज देवाची आरती केली जाते.

आपल्याला असे वाटत असते की देवाने आपल्याला सुखी ठेवावे कशाचीही कमतरता ठेवू नये. आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर व्हाव्यात आणि आपले आयुष्य हे आनंदाचे होऊन जावे. ते सर्व केल्यामुळे देवाची आपल्यावर सतत कृपादृष्टी राहत असते देव आपल्याला बऱ्याचदा चमत्कार सुद्धा दाखवत असतात परंतु हे चमत्कार आपण सहजपणे समजू शकत नाही.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशा गोष्टी काही देवाचे असे संकेत. आपण दररोज झोपतो झोपल्यानंतर आपल्याला निरनिराळे स्वप्न पडत असतात रात्री पडलेले हे स्वप्न काही लोकांचा सकाळपर्यंत लक्षात राहत नाही. रात्री पडलेल्या या स्वप्नांचा वेगवेगळा अर्थ असतो परंतु आपल्याला हे काही माहीत नसते.

तर तुमच्या स्वप्नांमध्ये बऱ्याचदा देव आले असेल तर याचा अर्थ असा आहे की देव तुमच्यावर खूपच प्रसन्न झाले आहेत. तुम्ही केलेल्या अपार भक्तीमुळे देव खुश झाले आहेत. स्वप्नामध्ये देव येणे हे खूपच शुभ मानले जाते. ज्या लोकांना देवाचा साक्षात्कार होणार असतो त्यांना स्वप्नामध्ये निरनिराळ्या गोष्टी दिसत असतात तर कधी स्वतः देवच स्वप्नात येत असतात.

असे म्हटले जाते की ज्या लोकांवर देवाची कृपा असते त्या लोकांना अगदी कमी मेहनती सुद्धा जास्त फळ मिळत असते. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक समस्यांना हे देवच वाचवत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post