जेव्हापण बॉलीवूड मधील कॉमेडी मॅन चे नाव घेतले जाते तेव्हा डोळ्यासमोर चेहरा उभा राहतो तो म्हणजे राजपाल यादव यांचा. राजपाल यादव यांच्या एक्टिंग चा प्रत्येक जण दीवाना आहे. त्यांच्या एक्टिंग मुळे सर्वजण वेड्यासारखे हसतच राहत असतात. राजपाल यादव यांचा जन्म 16 मार्च 1971 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. राजपाल यादव यांनी 1999 मध्ये आलेल्या 'मस्त' या चित्रपटा पासून चित्रपटात काम करणे सुरू केले.

राजपाल यादव यांचे असे स्वप्न होते की त्यांना चित्रपटांमध्ये खूप मोठाल्या भूमिका मिळाव्यात. परंतु त्यांच्या नशीबाने त्यांना साथ दिली नाही त्यांना चित्रपटांमध्ये अगदी छोट्याशा भूमिका मिळत असे. परंतु चित्रपटात ज्या त्यांच्या छोट्या च्या भूमिकेमुळे लोक अगदी लोटपोट होऊन हसत असे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे बऱ्याचशा चित्रपटामध्ये त्यांना कॉमेडी मॅन ची भूमिका मिळत असे.

राजपाल यादव यांच्या परिवाराविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे. याचे कारण म्हणजे राजपाल यादव यांनी आपल्या परिवाराला खूपच सगळ्यांपासून दूर ठेवले आहे. केवळ दहा टक्के लोकांना हे माहिती असेल की राजपाल यादव यांची पत्नी कोण आहे. राजपाल यादव यांची उंची पाच फुट दोन इंच एवढी आहे. त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे.

त्यांच्या पत्नीचे नाव राधा असे असून त्यांची उंची पाच फूट तीन इंच एवढी आहे. त्या राजपाल यादव यांच्या पेक्षा एक इंचाने मोठ्या आहेत. दोघांचे नाते खुपच सुंदर आहे राजपाल यादव यांचे वय आता 48 वर्ष एवढे झाले आहे. राजपाल यादव यांनी आपल्या चित्रपटांद्वारे सर्वांना खूपच खळखळून हसवले आहे.

त्यांनी आपल्या बॉलीवूड मध्ये मिळालेल्या प्रत्येक अभिनयामध्ये जीव तोडून काम केले आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय खरोखरच पारखण्याजोगा आहे. त्यांनी अक्षय कुमार गोविंदा सारख्या बऱ्याच मोठ्या अभिनेत्यांबरोबर काम केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post