
बॉलिवूडमध्ये असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर लोकांचे मन जिंकले आहेत. परंतु त्यांना कधीही सोबत पाहिले गेले नाही. असेच काही घडले आहे माधुरी दीक्षित आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत हे शेवटचे 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटाच्या ओय मखना या गाण्यामध्ये एकत्र दिसले होते. हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते परंतु त्यानंतर पुन्हा कधीच अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करताना दिसले नाही.
यामागील कारण आम्ही सांगणार आहोत या लेखातून, का अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित एकत्र चित्रपट करत नाही?
या एका कारणामुळे दोघांनी एकत्र काम केले नाही:-
माधुरी दीक्षित नाही आपल्या अभिनयाचा खरा प्रवास ऐंशीच्या दशकामध्ये सुरू केला होता या काळात माधुरी दीक्षित चे बरेच सिनेमे लोकप्रिय ठरले होते. लोकही माधुरी दीक्षित चे प्रत्येक सिनेमे बघायला तितक्याच आवडीने जात असे. त्या काळापर्यंत अमिताभ बच्चन हे खूप मोठे स्टार बनले होते.
माधुरी दीक्षितला बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचे एक नाव निर्माण करायचे होते त्यामुळे ति अनिल कपूर बरोबर एका मागोमाग एक अनेक चित्रपट करत गेली. अनिल कपूर बरोबर केलेले बेटा, राम लखन, परिंदा हे काही चित्रपट लोकप्रिय देखील ठरले. या चित्रपटांमुळे माधुरी आणि अनिल कपूर यांची जोडी खूपच लोकप्रिय ठरली तसेच तोपर्यंत माधुरी दीक्षित एक खूप मोठी स्टार देखील बनली होती.
या काळातच माधुरीला अमिताभ बरोबर काम करण्याची संधी मिळाली परंतु अनिल कपूरने हे काम न करण्यास सांगितले कारण माधुरी दीक्षित ला घेऊन त्याकाळात अनिल कपूर खूपच सकारात्मक होते. अनिल कपूर यांना वाटत होते की माधुरीने दुसऱ्या सोबत काम करू नये. या कारणाने तेव्हा अमिताभबरोबर माधुरीने एकही चित्रपट केला नाही आणि नंतर अमिताभ यांनी देखील माधुरी बरोबर एकही चित्रपट केला नाही.
Post a comment